Google Search Results 2021 वाचा 'गूगल'वर २०२१ मध्ये नागरिकांनी काय-काय शोधलं?

Google's Year in Search 2021, people just wanted to get better २०२१ मध्ये तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने नागरिकांनी गूगलवर भरपूर सर्चिंग केले. हाच प्रकार २०२०च्या अखेरच्या काही आठवड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसला होता. 

Google's Year in Search 2021
वाचा 'गूगल'वर २०२१ मध्ये नागरिकांनी काय-काय शोधलं? 
थोडं पण कामाचं
  • वाचा 'गूगल'वर २०२१ मध्ये नागरिकांनी काय-काय शोधलं?
  • २०२१ मध्ये तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने नागरिकांनी गूगलवर भरपूर सर्चिंग केले
  • हाच प्रकार २०२०च्या अखेरच्या काही आठवड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसला

Google's Year in Search 2021, people just wanted to get better नवी दिल्ली: जगभर कोरोना संकट सुरू आहे. या संकटाचा मोठा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांच्या दैनंदिन 'सर्च'वरही कोरोना संकटाचा परिणाम झाला आहे. यामुळेच २०२१ मध्ये गूगल या सर्च इंजिनवर रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे उपाय, निरोगी राहण्यासाठी काय करावे, कोरोना होऊ नये म्हणून काय करावे, कोरोना झाल्यास काय करावे...? अशा स्वरुपाचे सर्च मोठ्या प्रमाणावर झाले. तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने नागरिकांनी गूगलवर भरपूर सर्चिंग केले. हाच प्रकार २०२०च्या अखेरच्या काही आठवड्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसला होता. 

कोरोना संकटातून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवणे, निरोगी राहणे यावर नागरिकांचा भर आहे. यासाठी गूगलवर सर्च करुन जास्तीत जास्त माहिती मिळवणे, सोपे उपाय जाणून घेणे यास नागरिक पसंती देत आहेत. निरोगी जीवन, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, लसीकरण, तब्येतीची काळजी घेण्यासाठी उपयुक्त असे घरगुती उपाय या विषयांशी संबंधित माहितीसाठी गूगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च होत आहे. 

जवळचे कोरोना चाचणी केंद्र, जवळचे लसीकरण केंद्र या दोन पर्यायांचा सर्च जगभरातून मोठ्या प्रमाणावर दररोज दिसत आहे. मानसिक आरोग्य, ताणतणाव, चिंता, सतत कसली तरी काळजी किंवा भीती वाटणे या भावना कशा हाताळाव्यात याबाबतही मोठ्या प्रमाणावर सर्च झाले. मनोरुग्ण कसा ओळखावा तसेच मनोरुग्णाच्या मदतीसाठी काय करावे याबाबतही भरपूर सर्चिंग झाले. 

ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानची मदत कशी करावी याबाबत भरपूर सर्च झाले. तर इतर महिन्यांमध्ये अशाच स्वरुपाचे सर्चिंग हैती, पॅलेस्टाइन या देशांना मदत देण्याच्या उद्देशाने झाले. लसीकरण स्वयंसेवक अर्थात Vaccination volunteer opportunities याबाबत गूगलवर सातत्याने सर्चिंग झाले. वर्षभर इंटरनेट वापरणाऱ्यांचा भर  स्वतःची आणि प्रियजनांची देखभाल करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळवण्यावर होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी