मुंबई : Smartphone मुळे सर्वच जण आता सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातही WhatsApp या सोशल मॅसेजिंग अॅप वापरत नाही, असा एकाही माणूस सापडणे मुश्किलच. हे वापरायला इतकं सोपंय की ते प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलयं. आपली सगळी कामं जणू हेच अॅप करतं. एकीकडे व्हॉट्सअॅपचे नवनवे फीचर्स येत असताना आता हे अॅप अनेकांना अडचणीत आणणार आहे. त्याला कारण म्हणजे WhatsApp चा डाटा चोरीला गेल्याची बातमी समोर आलीय. (How to prevent WhatsApp data leak?)
जगभरातील अनेक देशांतील WhatsApp च्या कोट्यवधी युझर्सची माहिती धोक्यात आली आहे. सध्याच्या रिपोर्टनुसार, जगभरातील 84 देशातील युझर्सचा डाटा चोरीला गेला आहे. या देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, इजिप्त, इटली, सऊदी अरब आणि भारताचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. तुमचा तुमचा डाटा हॅकर्स इतर कंपन्याना विक्री करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. व्हाट्सअपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी हॅकिंग मानण्यात येत आहे. त्याआधारे हॅकर्स युझर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्र, नातेवाइकांची फसवणूक करू शकतात. तसेच बँक खात्यावरही डल्ला मारल्या जाऊ शकतो.
अधिक वाचा : Whatsapp New Feature: व्हॉट्सअपवर येतंय नवं फिचर, स्टेटस लावण्यासाठी मिळणार आणखी एक पर्याय
पण व्हॉट्सअॅपने मात्र डेटा लिकचे खंडन केले असले, तरी खबरदारी म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. व्हॉट्सअॅपचा डेटा चोरी झालेल्या ५० कोटी यूजर्समध्ये तुमचाही समावेश आहे का, हे तुम्ही तपासू शकता. सायबरन्यूजच्या संकेतस्थळावर गेल्यावर वरील बाजूला ‘टूल’ नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर त्यातील ‘पर्सनल डेटा लीक चेकर’वर क्लिक करा. नवीन विन्डो ओपन झाल्यावर त्यातील सर्च बॉक्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-आयडी प्रविष्ट करून तुमचा डेटा लीक झाली की नाही, हे तपासता येते.