Humans to attain immortality by 2029-30 says former Google scientist Ray Kurzweil : माणूस 2029-30 पर्यंत अमरत्वाचा फॉर्म्युला शोधण्यात यशस्वी होईल, असा दावा गूगलचे माजी शास्त्रज्ञ रे कुर्झवील यांनी केला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रे कुर्झवील यांनी केलेली 85 टक्के भाकीते खरी ठरली आहेत. यामुळे रे कुर्झवील यांच्या अमरत्वाच्या भाकीताने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
माणूस वैद्यकीय विज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने संशोधन करून नवनिर्मिती करत आहे. प्रगतीचा वेग बघता लवकरच माणूस प्रयोगशाळेत अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर मानवी पेशींची निर्मिती करू शकेल. पेशींच्या निर्मितीमुळे माणसाला कोणत्याही प्रकारचा आजार झाला अथवा इजा झाली तर निरोगी पेशी शरीरात सोडणे शक्य होईल. निरोगी पेशींच्या मदतीने एखादा अवयव विकसित करून तो शरीराला जोडणेही शक्य होईल. वयपरत्वे माणसाच्या काही पेशी कमकुवत होतात. पण कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या पेशी शरीरात सोडून माणूस कायम तरुण राहू शकेल. प्रयोगशाळेतील पेशींच्या जोरावर तारुण्य टिकवणे, निरोगी राहणे आणि सामान्य जीवन जगणे सोपे होईल. यामुळे मृत्यूचा धोका टळेल, अशा स्वरुपाचे भाकीत गूगलचे माजी शास्त्रज्ञ रे कुर्झवील यांनी केले आहे.
रे कुर्झवील यांच्या भाकीताचा व्हिडीओ यू ट्युबवर त्यांच्या अधिकृत चॅनलवर (https://www.youtube.com/@adagioofficial23/videos) उपलब्ध आहे. या व्हिडीओमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. माणूस जगणे सोपे करण्यासाठी विज्ञानाची मदत घेता घेता निसर्गचक्रावर मात करणार का आणि असे झाले तर त्याचे गंभीर परिणाम होतील का अशी चर्चा सुरू झाली आहे.
मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे 2045 पर्यंत मिलन होईल आणि पृथ्वीवर अफाट बुद्धिमत्ता असलेली नवी व्यवस्था निर्माण होईल, असेही गूगलचे माजी शास्त्रज्ञ रे कुर्झवील यांनी सांगितले. नॅनो तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स नॅनोबॉट्सच्या जन्माचे कारण ठरणार आहे. नॅनोबॉट्स अतीसुक्ष्म पेशींची निर्मिती अल्पावधीत आणि मोठ्या प्रमाणात करेल. हे तंत्रज्ञानच माणसाला अमरत्वाचा फॉर्म्युला मिळवून देईल, असा दावा गूगलचे माजी शास्त्रज्ञ रे कुर्झवील यांनी केला आहे.
याआधी 1990 मध्ये रे कुर्झवील कॉम्प्युटर जागतिक किर्तीच्या बुद्धिबळपटूला हरवेल असे भाकीत वर्तवले होते. हे भाकीत 2000 उजाडेपर्यंत खरे होईल असे ते म्हणाले होते. प्रत्यक्षात 1997 मध्ये जागतिक किर्तीचा बुद्धिबळपटू असलेल्या क्रोएशियाच्या गॅरी कॅस्परोव्हला डीप ब्ल्यू नावाच्या कॉम्प्युटरने हरवले.
जगाच्या बहुतांश भागात 2010 पर्यंत हाय बँडविड्थ इंटरनेट पोहोचले असेल असे रे कुर्झवील म्हणाले होते. हे भाकीत खरे ठरल्याचे दिसत आहे. यानंतर रे कुर्झवील यांनी हजार डॉलरचा लॅपटॉप मानवी मेंदूपेक्षा जास्त माहितीचे संकलन आणि विश्लेषण सहज आणि वेगाने करेल असे भाकीत 1999 मध्ये वर्तविले होते. हे भाकीत पण खरे ठरले. यामुळे रे कुर्झवील यांची नवी भाकीते पण खरी ठरतील असे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत.
निरोगी राहण्यासाठी चिमुरड्यांनी खाण्याचे पदार्थ