WhatsApp Tips : तुमचा इंटरनेट डेटा व्हॉट्सअ‍ॅप खातोय काय? या टिप्सच्या मदतीने वाचवा तुमचा इंटरनेट डेटा

Internet Data : अलीकडच्या काळात प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन (Smartphone) असतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅपशिवाय (WhatsApp) स्मार्टफोनची कल्पनादेखील करता येत नाही. व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वच थरातील लोकांसाठी संवादाचे साधन झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर दररोज लाखो लोक एकमेकांना मेसेज पाठवण्यासाठी, संवादासाठी करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप प्रत्येकालाच हवेहवेसे वाटते आणि त्याशिवाय काम पुढे सरकत नाही.

WhatsApp Tips
व्हॉट्सअप टिप्स 
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअ‍ॅपशिवाय (WhatsApp) स्मार्टफोनची कल्पनादेखील करता येत नाही.
  • व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
  • ्हॉट्सअ‍ॅपचा वापर दररोज लाखो लोक एकमेकांना मेसेज पाठवण्यासाठी, संवादासाठी करतात.

WhatsApp Tips for Internet Usage : नवी दिल्ली : अलीकडच्या काळात प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन (Smartphone) असतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅपशिवाय (WhatsApp) स्मार्टफोनची कल्पनादेखील करता येत नाही. व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वच थरातील लोकांसाठी संवादाचे साधन झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर दररोज लाखो लोक एकमेकांना मेसेज पाठवण्यासाठी, संवादासाठी करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप प्रत्येकालाच हवेहवेसे वाटते आणि त्याशिवाय काम पुढे सरकत नाही. परंतु त्याची एक नकारात्मक बाजू देखील आहे. खरं तर व्हॉट्सअॅप वापरा किंवा न वापरा, पण इतर कोणत्याही अॅप्लिकेशनप्रमाणे, हे अॅपदेखील खूप इंटरनेट डेटा (Internet Data)वापरते. आपल्या मोबाइलमधील इंटरनेट डेटा कसा वाचवायचा ते पाहूया. (If WhatsApp is consuming your internet data, use this tips to control it)

अधिक वाचा : Car Performance Tips: तुमची कार भरपूर पेट्रोल पिते का? या टिप्स वापरा, होईल पेट्रोलची मोठी बचत

इंटरनेट डेटाचा वापर

व्हॉट्सअॅप तर वापरायचे आहे मात्र ते खूप इंटरनेट डेटा वापरते, या समस्येमुळे लोकांचा इंटरनेट डेटा अनेकदा संपतो. विशेषतः जे वाय-फाय वापरत नाहीत आणि दैनंदिन जीवनात मर्यादित इंटरनेट डेटावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी हे खूप त्रासदायक ठरू शकते. इंग्लंडमधील एका प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, रिअल-टाइम संदेश देणारे, माहितीचे अपडेट्स देणारे आणि बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्लिकेशन्स खूप इंटरनेट डेटा वापरतात.

अधिक वाचा : Face Beauty Tips: या 3 नैसर्गिक गोष्टींमुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल चमक...दिसाल तरुण आणि सुंदर

युजर्सना या वृत्तात सूचना करण्यात आली आहे की त्यांनी डेटा पॅकेज वापरून आपल्या कामाबद्दल अलर्ट सेट करावे. यामध्ये मीडिया अपडेट मर्यादित करणे, ब्रॉडकास्ट करणे आणि शोध ब्राउझ करणे यासारख्या कामांचा समावेश आहे. मात्र काही अॅप्स बॅकग्राउंडमध्ये सक्रियपणे चालू असताना डेटा वापरण्यापासून रोखले जाऊ शकतात. अँड्रॉइड आणि आयफोन फोन वापरणारे युजर्स व्हॉट्सअॅपला इंटरनेटशी कनेक्ट होण्यापासून थांबवू शकतात. त्याचबरोबर खास वैशिष्ट्य बंद करून त्यांचा मोबाइल डेटा वाचवू शकतात.

इंटरनेट डेटा वाचण्यासाठी हे फीचर कसे बंद करावे-

  1. स्टेप 1: सेटिंग्ज टॅब सक्रिय करा.
  2. स्टेप 2: डेटा वापराचा पर्याय निवडण्यासोबतच, युजर्स बॅकग्राउंडमध्ये डेटा वापरत असलेली यादी पाहू शकतील.
  3. स्टेप 3: या यादीमधून WhatsApp निवडा आणि नंतर पुढे सुरू ठेवा.
  4. स्टेप 4: हा पर्याय बंद करण्यासाठी बॅकग्राउंड डेटा वापर पर्यायाला टॉगल ऑफ करा.

अधिक वाचा : Indian Railways Update: रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, तुमचा प्रवास होणार अधिक सुखकारक

याशिवाय दुसरा पर्यायही वापरता येईल. सर्वप्रथम Settings वर जा. नंतर सेल्युलर डेटा पर्याय निवडा आणि स्लाइडर हलवा. हे फीचर बंद करण्यासाठी WhatsApp पर्याय निवडा.

समोर आलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर पाहायला मिळू शकते. या फीचरनुसार यूजर्स डिलीट केलेले मेसेज रिस्टोअरही करू शकतील. जेव्हा युजर्स व्हॉट्सअॅप चॅटमधून संदेश हटवतात तेव्हा स्क्रीनच्या तळाशी एक पॉपअप दिसेल. या पॉप-अपमध्ये 'मेसेज डिलीट' लिहिलेले असेल आणि त्यासोबत 'अनडू' बटणही असेल. हा पॉपअप काही सेकंदांसाठी उपस्थित असेल आणि नंतर अदृश्य होईल. या वेळेत युजरने पूर्ववत पर्याय निवडल्यास, हटवलेला संदेश पुन्हा मिळवता येईल.

मात्र जर पॉपअप गायब झाला तर डिलीट केलेला मेसेज अनडिलीट करण्याचा कोणताही मार्ग नसेल. या फीचरमुळे युजर्स महत्त्वाचे मेसेज डिलीट होण्यापासून वाचवू शकतात. युजर्सना या फीचरमध्ये प्रवेश आहे की नाही हे तपासायचे असल्यास, ते Android आवृत्ती 2.22.18.13 वरील Google बीटा प्रोग्रामवर तसे करू शकतात. मात्र, व्हॉट्सअॅपच्या अंतिम आवृत्तीत त्याचा समावेश कधी होणार, याची माहिती समोर आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी