Instagram, Twitter ब्ल्यू टिकसाठी अर्ज केला असेल, तर सावधान...

Instagram Blue Tick: इंस्टाग्रामवर ब्ल्यू टिक मिळविण्याचा नादात काही जण एक चूक करतात जी त्यांना बरीच महागात पडू शकते. जाणून घ्या याचविषयी.

if you have applied for blue tick on instagram be careful your account may be hacked
Instagram, Twitter ब्ल्यू टिकसाठी अर्ज केला असेल, तर सावधान!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एक क्लिक आणि अकाउंट हॅक, इंस्टाग्रामवर करु नका 'ही' चूक
  • Instagram अकाउंट होऊ शकतं हॅक
  • सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्याच्या आल्या आहेत नव्या पद्धती

Instagram Blue Tick: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता एक नवे जग निर्माण झाले आहे. इथे व्हेरिफाईड (Verified) अकाउंट असणं म्हणजे तुम्ही एलिट क्लासचे आहात असे अनेक जण समजतात. पण काही वेळा एलिट क्लासच्या नादात यूजर्संना खूप त्रास सहन करावा लागतो. ब्ल्यू टिकसाठी तुम्ही काही माहिती भरताना चुका केल्यास त्याच चुकांचा हॅकर्स फायदा घेतात आणि मग तुमचे अकाउंट हॅक करतात. हे नेमकं कसं होतं ते आपण सविस्तर जाणून घेऊया.  (if you have applied for blue tick on instagram be careful your account may be hacked)

सोशल मीडियावर आपलं अकाउंट व्हेरिफाइड असावं असं कोणाला वाटत नाही? इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर तुमच्या नावासमोर निळ्या रंगाची टिक असेल तर सोशल मीडियावर तुमचा एक वेगळाच रुबाब असतो. सुरुवातीच्या टप्प्यात, सोशल मीडिया कंपनी ब्ल्यू टिकसाठी स्वत: लोकांशी संपर्क साधत असे, परंतु बदलत्या काळानुसार कंपन्यांनी यासाठी एक संपूर्ण यंत्रणा तयार केली आहे.

अधिक वाचा: Google: गुगलने यूजर्संना दिलं प्रचंड मोठं गिफ्ट!

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर निळ्या रंगाची टिक असावी, तर तुम्ही त्यासाठी थेट अर्ज करू शकता. यानंतर कंपनी तुमचं प्रोफाइल रिव्ह्यू करेल आणि सांगेल की तुम्ही ब्ल्यू टिकसाठी पात्र आहात की नाही.

ही नवीन प्रणाली सुरू झाल्यापासून सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचा धोकाही वाढला आहे. तुम्हीही इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी अर्ज केला असेल, तर थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा फक्त तुमची एक चूक महागात पडू शकते.

ब्ल्यू टिकच्या नावावर कशी होते फसवणूक?

जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर ब्ल्यू टिकसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला Instagram नावाशी निगडीत काही मेसेज मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये 'आम्ही तुमच्या अकाउंटचे रिव्ह्यू केले आहे आणि तुम्ही ब्ल्यू टिकसाठी पात्र आहात' असे लिहिलेले आहे. मेसेजमध्ये काही सोप्या स्टेप्स फॉलो करण्याविषयी देखील लिहिलेले असते.

अधिक वाचा: Twitter: ट्विटरवर 'ब्लू टिक' हवी आहे? महिन्याला मोजावे लागतील इतके पैसे; मस्क यांचा निर्णय

जर तुम्ही ते अकाउंट तपासले तर तुम्हाला कळेल की, त्याचे फॉलोअर्स लाखोंमध्ये आहेत. मेसेज लिहिण्याचे स्वरूप देखील असे असेल की ते अकाउंट खरेच आहे असेच समोरच्या व्यक्तीला वाटेल.

तुमच्याकडून दोन-तीन साधी माहिती मागितल्यानंतर तुम्हाला एक ईमेल अ‍ॅड्रेस दिला जाईल आणि तुमच्या अकाउंटवर जाऊन अपडेट करण्यास सांगितले जाईल. 

जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये तो ईमेल अ‍ॅड्रेस अपडेट कराल तेव्हा तात्काळ तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होईल. कारण समोर बसलेल्या हॅकरला त्याच ईमेल अ‍ॅड्रेसवरुन तुमच्या अकाउंटचा पासवर्ड रीसेट करण्यास परवानगी मिळेल. हे सर्व घडत असताना तुम्हाला कळणारही नाही, कारण तुम्हीच तुमच्या अकाउंटमध्ये हॅकरचा ईमेल अ‍ॅड्रेस अपडेट केलेला आहे.

या तंत्राला म्हणतात फिशिंग 

वास्तविक, हॅकिंगच्या या पद्धतीला फिशिंग म्हणतात. फिशिंगची ही पद्धत थोडी आधुनिक आहे. यापूर्वी हॅकिंगसाठी ईमेल किंवा मेसेजवर बनावट लिंक पाठवल्या जात होत्या. लिंक ओपन केल्यावर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तुमच्याकडून पासवर्ड काढून तुमचे खाते हॅक केले जायचे.

बदलत्या काळानुसार लोकांमध्येही जागरूकता वाढली आहे. अज्ञात लिंकवर क्लिक न करणे किंवा पासवर्ड शेअर न करणे यासारख्या गोष्टी जवळपास प्रत्येकाला माहीत आहेत. कदाचित त्यामुळेच हॅकर्सही फिशिंगच्या नवनवीन पद्धती अवलंबत आहेत.

ब्ल्यू टिकच्या नावावर केली जाते पैशांची मागणी 

अनेक वेळा खात्यावर ब्ल्यू टिक देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. पैसे मागणारी व्यक्ती स्वत: सोशल मीडिया कंपनीशी संबंधित असल्याचे सांगतात. कधीकधी तुम्हाला फसवण्यासाठी 100% रिफंड गॅरंटी देखील दिली जाते, परंतु ही सर्व फसवणूक आहे. जर तुमच्याकडूनही कोणी ब्ल्यू टिक मिळवून देण्याच्या नावाखाली पैशाची मागणी करत असेल तर त्याला अजिबात बळी पडू नका.

ट्विटरवरही होते फसवणूक 

ब्ल्यू टिकच्या नावावर फिशिंग किंवा पैशांची मागणी केवळ इन्स्टाग्रामवरच होत नाही, तर ट्विटरवरही या फसवणुकीच्या घटना घडतात. कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली हॅकर्संना यूजर्सची दिशाभूल करणे सोपं असतं.  

इंस्टाग्राम किंवा ट्विटर हॅकर्सवर का करत नाही कारवाई?

तुम्ही विचार करत असाल की, एवढी फसवणूक होत असताना इन्स्टाग्राम किंवा ट्विटरसारख्या सोशल मीडिया कंपन्या त्यावर कारवाई का करत नाहीत? पण खरं तर अशा प्रकारची फसवणूक थांबवण्यासाठी या कंपन्यांची संपूर्ण टीम काम करते.

अधिक वाचा: अवघड सोपे झाले हो.. WhatsApp वर काढा मेट्रोचे तिकिट!

कधीकधी फिशिंगचा संशय असलेल्या अकाउंटवर बंदी घातली जाते. पण दररोज असे अनेक अकाउंट तयार होत असतात. त्यामुळे अशा फिशिंग  अकाउंटवर सतत नजर ठेवणं हे कधीकधी सोशल मीडिया कंपन्यांसाठी देखील कठीण असतं.

इंस्टाग्राम आणि ट्विटर असे अनेक बनावट अकाउंट मोठ्या प्रमाणात आहेत. जे तुम्हाला पूर्णपणे अधिकृत वाटतील. 

फसवणूक कशी टाळायची?

जोपर्यंत यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवावे लागेल. लक्षात ठेवा की, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्हाला ब्ल्यू टिकसाठी मेल किंवा मेसेज करणार नाही. जर कोणत्याही कंपनीला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते त्यांच्या अॅपमध्येच तुम्हाला संबंधित मेसेज किंवा नोटिफिकेशन पाठवेल.

अधिक वाचा: बुलेटप्रेमींची धडधड वाढली; 18 नोव्हेंबरला येतेय Royal Enfield ची 650cc 'सुपर' बाईक

अशा कोणत्याही मेल किंवा मेसेजला उत्तर देऊ नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. जर कोणी ब्ल्यू टिक घेण्यासाठी पैसे मागितले तर त्याला लगेच ब्लॉक करा. तसेच, तुमच्या सर्व सोशल मीडिया खात्यांवर नेहमी टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन सुरु ठेवा. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी