कोरोनाच्या निर्बंधामुळे चिंताग्रस्त आहात, मग हे अॅप आहेत तुमच्या दिमतीला

सोशल सॅव्ही
Updated Apr 02, 2021 | 23:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. डिजिटल जमान्यात अनेक अॅप किंवा सेवा उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला घरपोच जेवण पुरवू शकतात. जाणून घेऊया अशाच अॅपविषयी.

Food delivery Apps that will serve you in corona crisis
कोरोनाच्या निर्बंधात फूड अॅप आहेत दिमतीला 

थोडं पण कामाचं

  • अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सरकारने लागू केले कडक निर्बंध लागू
  • विद्यार्थी, नोकरदार मंडळी यांची जेवणाची होते गैरसोय
  • डिजिटल जमान्यात अनेक अॅप किंवा सेवा उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला घरपोच जेवण पुरवतात

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. पूर्णपणे लॉकडाऊन जरी झालेले नसले तरी बऱ्याचशा सेवांवर बंधने आली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे निर्बंध लागू आहेत. अशात विद्यार्थी, नोकरदार मंडळी यांची अनेक बाबतीत गैरसोय होत असते. जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी मेस, उपहारगृहांवर अवलंबून असणाऱ्यांची तर मोठी अडचण होते आहे. 

परंतु आता डिजिटल जमान्यात अनेक अॅप किंवा सेवा उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला घरपोच जेवण पुरवू शकतात. जाणून घेऊया अशाच अॅपविषयी.

१. स्विगी ( https://www.swiggy.com/ )

अत्यंत लोकप्रिय झालेले हे अॅप देशातील फूड ऑर्डरच्या क्षेत्रातील टॉप रेटेड अॅप आहे. जवळच्या हॉटेलमधून अन्न पदार्थ तुमच्या दारापर्यत पोचवण्यासाठी स्विगी लोकप्रिय झाले आहे. सध्यातरी फूड ऑर्डरिंगमध्ये हे देशातील नंबर वन अॅप ठरले आहे. ऑर्डर देण्यासाठी कोणतीही किमान अट येथे लागू नाही. 


२. झोमॅटो ऑर्डर ( https://www.zomato.com/ )

झोमॅटो हे आणखी एक फूड ऑर्डरिंग अॅप किंवा सेवा लोकप्रिय झाली आहे. झोमॅटो या उपहारगृहाच्या चालकांनीच हे अॅप सुरू केले आहे. देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये यांची सेवा उपलब्ध आहे. भारतासह जवळपास २५ देशांमध्ये यांची सेवा उपबल्ध आहे. ग्राहक मेनूमधून निवडकरून जवळच्या उपहारगृहातून आपला आवडीचा पदार्थ मागवू शकतात.

३. उबेर इट्स (झोमॅटो ऑर्डर) ( https://www.ubereats.com/ )

उबेर इट्स हेसुद्धा मुंबई, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये लोकप्रिय होत असलेले अॅप आहे. उबेर टेक्नॉलॉजीसने याची स्थापना केली आहे. उबेर ही जगभरातील एक अत्यंत लोकप्रिय टॅक्सी सेवा आहे. उबेर इट्स जगभरातील १०००पेक्षा जास्त शहरांमधून सेवा पुरवते. स्विगी आणि झोमॅटोला अल्पावधीत त्यांनी मोठी स्पर्धा निर्माण केली होती. तुमच्या पहिल्या ऑर्डरवर तुम्हाला येथे ऑफरदेखील दिली जाते. २०१९ नंतर उबेर इट्सचे झोमॅटोमध्ये विलीनीकरण झाले आहे. सध्या ते झोमॅटो ऑर्डर नावाने प्रचलित आहे.

४. फूडपांडा ( https://www.foodpanda.com/ )

हेदेखील ऑनलाईन म्हणजेच वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून फूड डिलिव्हरीसाठी सेवा पुरवते. आघाडीच्या फूड ऑर्डरिंग अॅपमध्ये याचा समावेश आहे. फूडपांडा विविध देशांमध्ये सेवा पुरवत असले तरी याचे मुख्यालय जर्मनीतील बर्लिन येथे आहे. विविध शहरांमधील स्थानिक उपहारगृहांशी त्यांनी करार केलेले आहेत.

५. जस्टइट ( https://www.justeattakeaway.com/ )


जस्टइट हे अॅप तुम्हाला जवळपासच्या हॉटेल किंवा उपहारगृहांमधून तुमच्या आवडीचा पदार्थ निवडण्याची सुविधा देते. ऑनलाईन ऑर्डरवर तुम्हाला सवलत किंवा कुपन कोड दिले जातात. भारतातील मोठ्या शहरांमध्ये हे प्रामुख्याने कार्यरत आहे.

सध्या या प्रकारातील अॅपमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करण्याआधी काही अॅपमधील ऑफरची तुलना करून चांगला सौदा पदरात पाडून घेऊ शकता. शिवाय वेळोवेळी या सर्व अॅपवर विविध योजनादेखील जाहीर होत असतात. त्यावर नजर ठेवल्यास तुमचे उदरभरणही होईल आणि शिवाय खिशाला मोठा फटकादेखील पडणार नाही.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी