Instagram Down : मुंबई : लोकप्रिय सोशल मीडिया ऍप इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. हे ऍप सुरू होत नसून त्यात काहीच सर्च होत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केले आहे. इन्स्टाग्राम हे ऍप फोटो, व्हिडीओ आणि रील्स शेअर करण्यासाठी वापरले जाते. अनेक सेलिब्रिटी या ऍपवर असून त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. तसेच अनेक लोकांचे व्यवसायही या इन्स्टाग्रामवर आहेत. आता युजर्संना इन्स्टाग्राम वापरताना अडचणीत येत आहे. यासाठी नेटकर्यांनी ट्विटवर तक्रारी केल्या आहेत.
इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार ट्विटवर केली जात आहे. ट्विटरवर अक्षरशः इन्स्टाग्राम बंद झाल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे. अशा प्रकारे इन्स्टाग्राम बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशा प्रकारे इन्स्टाग्राम डाऊन झाले होते. सोमवार रात्रीपासून हा प्रॉब्लेम येत असल्याचे युजर्सने सांगितले आहे.
@instagram anu na #instagramerror #instagramdown #instagrambwiset https://t.co/UvUhlcJlrJ pic.twitter.com/T59Eo6iqo6 — j🍓⁷ (@JinJl34) July 19, 2022
इन्स्टाग्राम युजर्संनी ट्विटरवर #InstagramDown हा हॅश टॅग ट्रेंड होत आहे. काही युजर्सनी गेल्या आठवड्यापासून हा प्रॉब्लेम येत असल्याचे म्हटले आहे. एका युजरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की जेव्हा जेव्हा मी @instagram ओपन करतो तेव्हा हे ऍप क्रॅश होऊन जातं. तेव्हा माझा फोन होम स्क्रीन वर येतो. २ जुलैपासून हा प्रॉब्लेम येत असल्याचे या युजरने म्हटले आहे. तर एका युजरने इन्स्टाग्रामच्या सर्च बारमध्ये काहीच सर्च होत नसल्याचे म्हटले आहे. परंतु आताच नव्हे तर अनेक दिवसांपासून इन्स्टाग्रामचा प्रॉबेल होत असल्याचे आपल्या लक्षात आले आहे असे या युजरने म्हटले आहे.
I can't search for anything on IG, so I came here to see if it was down and it looks to me, it's been happening for days....#instagramdown pic.twitter.com/5kSP6HH1yC — °•terry the multifan - renaissance act i 👑•° (@terxhaniverse98) July 19, 2022
असे असले तरी भारतीय युजर्सला इन्स्टाग्राम वापरताना कुठलाही प्रॉब्लेम आलेला दिसत नाही. याचा अर्थ भारतात इन्स्टाग्राम व्यवस्थित सुरू आहे. परंतु पाश्चिमात्य देशात इन्स्टाग्राम डाऊन झाल्याचे समोर आले आहे. असे असले तरी इन्स्टाग्रामने याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही.