इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर पुन्हा डाऊन!

आठवड्याभरात दुसऱ्यांदा इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप काही काळ बंद पडले.

Instagram, Facebook, WhatsApp down for second time this week
इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर पुन्हा डाऊन! 

थोडं पण कामाचं

  • इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर पुन्हा डाऊन!
  • तांत्रिक समस्येमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले
  • आठवड्याभरात दुसऱ्यांदा सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली: आठवड्याभरात दुसऱ्यांदा इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप काही काळ बंद पडले. तांत्रिक समस्येमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. तंत्रज्ञांनी सर्व्हर पुन्हा कार्यरत करुन सेवा सुरळीत करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केल्याचे सांगितले. याआधी रविवार-सोमवार दरम्यान (३ आणि ४ ऑक्टोबर दरम्यान) इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले होते. आठवड्याभरात दुसऱ्यांदा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे असंख्य युझरना इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरणे कठीण झाले. काही दिवसांच्या अंतराने दोन वेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अंतर्गत चौकशी करुन कंपनी व्यवस्थापन दोषींवर कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. Instagram, Facebook, WhatsApp down for second time this week

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी