Jio IPL Tariff Plans: जिओने लाँच केले क्रिकेटचे नवे प्लॅन्स, घर बसल्या पाहा IPL

Jio IPL Tariff Plans: क्रिकेट आयपीएलची प्रसिद्ध लीग सुरू होणार आहे. जिओने क्रिकेट प्रेमींसाठी अनेक नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत.

 Jio
Jio IPL Tariff Plans: जिओने लाँच केले क्रिकेटचे नवे प्लॅन्स, घर बसल्या पाहा IPL  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: Jio IPL Tariff Plans: तमाम क्रिकेट रसिकांची सर्वात आवडती क्रिकेट (Cricket) मालिका आयपीएल (IPL) सुरू होण्यासाठी आता फक्त अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. दरम्यान, क्रिकेट प्रेमींना घरातूनच आयपीएलचा आनंद घेता यावा यासाठी जिओने (Jio) आगामी क्रिकेट हंगाम अर्थात आयपीएल-१३ साठी अनेक नवीन टॅरिफ प्लॅन (Plan0 जाहीर केले आहेत. 'जिओ क्रिकेट प्लॅन' (Jio Cricket Plan) अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या प्लॅन्समध्ये डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह १ वर्ष डिस्ने + हॉटस्टार VIP चं सब्सक्रिप्शन  मिळेल. या सबस्क्रिप्शनची किंमत केवळ ३९९ रुपये आहे.

जिओ किक्रेट प्लॅन्समध्ये क्रिकेट प्रेमींना डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅपद्वारे फ्री लाइव्ह ड्रीम ११ आयपीएल सामने पाहू शकतात. हे प्लॅन्स १ महिन्यांपासून १ वर्षांपर्यंत वैधता असणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. या प्लॅनची वैधतेची कितीही दिवसांची असली तरीही डिस्ने + हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन पूर्ण वर्षासाठी  असणार आहे.

जिओ क्रॅकेट प्लॅन ४०१ रुपयांपासून सुरू होणारे हे प्लॅन्स २५९९ रुपयांपर्यंत आहेत. २८ दिवसांच्या वैधतेसह ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला ३ जीबी डेटा मिळेल. त्याचवेळी ५९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा उपलब्ध असेल. परंतु त्याची वैधता फक्त ५६ दिवसांची असेल. तर ८४ दिवसांच्या प्लॅन्सची किंमत ७७७ रुपये एवढी आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय २५९९ रुपये किंमतीच्या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळेल.

संपूर्ण सामना एकाहून अधिक वेळा पाहण्याऱ्या चाहत्यांसाठी जिओ क्रिकेटच्या प्लॅनमध्ये अॅड-ऑन सुविधा देखील उपलब्ध आहे. ४९९ रुपयांच्या १.५ जीबी डेटा प्रतिदिन टॉप-अप उपलब्ध आहे. ज्याची वैधता ५६ दिवस असेल. अ‍ॅड-ऑन प्लॅन्स हे तुम्ही वापरत असलेल्या प्लॅन्ससोबत देखील घेऊ शकतात. त्यात डेटासह १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅपचं सब्सक्रिप्शन देखील असेल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी