Koo App ने बदलला आपला लूक, आता घ्या ब्राउजिंगचा खास अनुभव

क्रिएटर्सना अधिकाधिक महत्त्व आणि वेगवान अनुभव देण्यासाठी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू'ने ॲपने आणली आहे एक खास गोष्ट.

Koo App changed your look, now take a special browsing experience
Koo App ने बदलला आपला लूक, आता घ्या ब्राउजिंगचा खास अनुभव 
थोडं पण कामाचं
  • यामागचा हेतू आहे यूजर्सना  ॲपवर जास्तीत जास्त वेळ घालवण्यास प्रोत्साहित करणे
  • क्रिएटर्सना अधिकाधिक महत्त्व आणि वेगवान अनुभव देण्यासाठी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू'ने ॲपने आणली आहे एक खास गोष्ट.
  • iOS आणि  ॲन्ड्रॉइड दोन्ही डिव्हाइसेसवर आपल्या यूजर्ससाठी ब्राउझिंगचा एक उत्कृष्ट अनुभव 'कू'ने सादर केला आहे.

नवी दिल्ली : क्रिएटर्सना अधिकाधिक महत्त्व आणि वेगवान अनुभव देण्यासाठी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू'ने ॲपने आणली आहे एक खास गोष्ट. iOS आणि  ॲन्ड्रॉइड दोन्ही डिव्हाइसेसवर आपल्या यूजर्ससाठी ब्राउझिंगचा एक उत्कृष्ट अनुभव 'कू'ने सादर केला आहे. दिसायला आकर्षक, सहज आणि ज्याच्याशी लगोलग जोडून घेता येईल असं हे डिझाइन युजर्सला विशेष ध्यानात घेऊन बनवले गेले आहे. मागच्या  आवृत्तीच्या तुलनेत हे एक महत्त्वाचे अपग्रेड आहे, ज्यात नव्या इंटरफेससह सहजपणे नेव्हिगेशन करता येते. यातून यूजर्सना एक उत्कृष्ट आणि रिअल टाइम अनुभव मिळतो. सोबतच यातून तुम्हाला सोशल मीडियाच्या दुनियेत तुम्हाला आगळ्या विचारांची व्यक्ती म्हणून ठसा उमटवण्याची संधी मिळते. (Koo App changed your look, now take a special browsing experience)

'कू' ॲपचा नवा ब्राउझिंग अनुभव सगळ्या यूझर इंटरफेसला खास बनवतो. ॲपच्या डावीकडची रिकामी जागा काढून टाकली आहे. यातून कंटेंट आता एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत नीटपणे पसरला आहे. यातून यूजर्सना त्यांच्या गरजेची माहिती पाहणं अगदीच सोपे झाले आहे. यात अनावश्यक कंटेंटही कमी केला गेला आहे. परिणामी ॲप अगदीच स्वच्छ दिसते. यूजर्सचा अनुभव खूप जास्त सहज आणि कसलाही अडथळा नसलेला बनतो. हा अनुभव केंद्रित आहे  ॲपचा वापर आणि यूजर्सद्वारे घालवला जाणारा वेळ वाढवणे यावर.

'कू'चे डिझाइन हेड, प्रियांक शर्मा म्हणाले, “यूजर्स आनंदी रहावे हाच आमच्या ब्रॅंडचा मुख्य हेतू असतो. विशेषकरून जेव्हा आमच्या यूजर इंटरफेसचा विषय येतो, तेव्हा आम्ही आपल्या यूजर्सना सर्वात उत्कृष्ट अनुभव देण्याबाबत सतत सजग असतो. या उत्कृष्ट ब्राउझिंग अनुभवाची सुरवात करून आम्ही एक चांगला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. याबाबत आम्हाला पूर्वीच कम्युनिटीकडून खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. कू ॲपवर उत्कृष्ट ब्राउझिंग अनुभव सादर करण्याच्या दिशेने केलेली ही केवळ सुरवात आहे."

'कू' ॲप भारतात प्रादेशिक भाषांमध्ये अभिव्यक्त होण्यासाठी सर्वात मोठा मंच आहे. सध्या 'कू'वर काळात हा युजर्सना मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड़, तमिल, बंगाली, असमिया, तेलुगू, पंजाबी आणि इंग्रजीत आपले विचार व्यक्त करण्याची संधी देतो. प्लॅटफॉर्म स्मार्ट फीचर्स लॉन्च करण्यासाठी सतत काम करतो. यातून यूजर्सच्या अनुभवांचा दर्जा वाढतो आणि त्यांना प्लॅटफॉर्मवर आधिकाधिक आनंद घेता येतो. 'कू'ने डार्क मोड, टॉक-टू-टाइप, चॅट रूम, लाइव्ह ही काही प्रमुख फीचर्स नुकतीच लॉन्च केलीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी