नवी दिल्ली : कू ॲप (Koo App) चे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांचे नाव आंतरराष्ट्रीय ना-नफा पत्रकारिता संस्था 'रेस्ट ऑफ वर्ल्ड' (RoW) च्या 100 सर्वात प्रभावशाली टेक लीडर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रादेशिक भाषांमध्ये ऑनलाइन अभिव्यक्तीचा अधिकार देणे हा कू ॲपचा मूळ हेतू आहे. यातून लाखो लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यातूनच कू ॲपला आजच्या जगातल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे एक अभिनव आणि प्रभावी ॲप म्हणून मान्यता मिळाली आहे. कू ॲपचे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांना RoW ने जगातल्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. या सगळ्या व्यक्ती अशा आहेत, ज्या अभूतपूर्व आव्हानांचा सामना करत विविध समूहांसाठी उत्पादनं तयार करतात.
भारतात केवळ 10 टक्के लोक इंग्रजी बोलतात. कू ॲपची निर्मिती इंटरनेट यूजर्सना सशक्त बनवण्यासाठी केली गेली. यामाध्यमातून युजर्स स्थानिक भाषांमध्ये व्यक्त होतात. स्थानिक समूहांमधील लोक शोधत त्यांच्याशी संवाद साधतात.
विशेष म्हणजे, कू ॲपचे अप्रमेय राधाकृष्ण भारतातले एकमेव उद्योजक आहेत, ज्यांना RoW100: ग्लोबल टेक्स चेंजमेकर्सच्या ‘संस्कृती आणि सोशल मीडिया' या श्रेणीत स्थान मिळाले आहे. RoW100: ग्लोबल टेक्स चेंजमेकर्स ही संस्था पाश्चिमात्य देशांमधील सक्रिय उद्योजक, इनोव्हेटर्स आणि गुंतवणुकदारांना सन्मानित करते. हे असे लोक आहेत, ज्यांचे उत्कृष्ट योगदान जगभरातल्या समुदायांमध्ये विधायक बदल घडवते आहे.
'कू' ॲपचे सह-संस्थापक आणि सीइओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “RoW100: ग्लोबल टेक्स चेंजमेकर्समध्ये आमचं नाव आल्याचा खूप आनंद होतो आहे, सोबतच अभिमानही वाटतो आहे. कारण यात आगळ्या आणि यशस्वी प्रयोगांद्वारे लाखो लोकांचं जीवन बदलणाऱ्या लोकांना स्थान दिले जाते. 'रेस्ट ऑफ़ वर्ल्ड'सारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून मान्यता मिळणे आमच्यासाठी खरोखर सन्मानाचे आहे. आम्ही भाषा-आधारित मायक्रो-ब्लॉगिंगमध्ये एक मैलाचा दगड गाठला आहे. आम्ही निर्माण केलेला मंच एक उत्कृष्ट बहुभाषिक अनुभव देतो. स्थानीय भाषांमध्ये आत्म-अभिव्यक्तीची गरज ही भारतासाठी कुठली अनोखी गोष्ट नाही. उलट हे एक जागतिक आव्हान आहे. कारण जगातले 80% लोक इंग्रजी नाही तर आपापल्या स्थानिक भाषा बोलतात. आमचा प्रयोग जागतिक स्तरावरचा आणि जगभरातल्या बाजारासाठी औचित्यपूर्ण आहे. आम्ही इंटरनेटच्या मुक्त विश्वात भाषेचे अडथळे ओलांडत विविध भाषिक संस्कृतीतल्या लोकांना जोडतो आहोत. भारतात बनवलेलं उत्पादन जगभरात घेऊन जाण्यावर सध्या आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे.”