Happy Mother's Day 2022 : मुंबई : जगभरातल्या मातांचे निस्वार्थ प्रेम, वात्सल्य आणि त्यागाला सलाम करत कू अॅपने या 'मदर्स डे'ला वर #MummyYaar नावाचे एक खास अभियान (Campaign) सुरू केले आहे. याद्वारे यूजर्स #मम्मी यार हॅशटॅगच्या (Hashtag) माध्यमातून आपल्या आईंचे आणि मातांचे आभार मानू शकतील. या अभियानातून आईंची अविचल निष्ठा आणि समर्पणाचे प्रतिबिंब उमटते. आजच्या जगातली आई सतत बदलणाऱ्या सोशल मीडियावर उत्साहात वावरते, त्यातले बदल समजून घेते. आपल्या आवडत्या भाषेत व्यक्त होते सोबतच या डिजिटल युगात समविचारी लोकांशी जोडून घेते. यातून आईंची जबरदस्त ताकद दिसते, ज्या माध्यमातून त्या आपल्या मुलांसह आसपासच्या लोकांचे जीवन घडवतात आणि सोबतच अनेक अविश्वसनीय आव्हानांचा सामनाही करतात.
जुन्या-पुरान्या सुखद आठवणींनी सजलेल्या या व्हीडियोसोबतच यानिमित्ताने कू अॅपने एका खास स्पर्धेचीही घोषणा केली. यात यूजर्सना आपल्या आई संदर्भातल्या अशा क्षणांबाबत सोशल मीडियावर लिहायचे आहे, ज्यात त्यांना "मम्मी, यार" अर्थात, "अरे यार, आई" असे उद्गार काढावे लागले. यूजर्सनी मीम्स, व्हिडियो आणि पोस्ट्सच्या माध्यमातून #MummyYaar वाले क्षण अगदीच रंजक पद्धतीने कू करायला सुरूही केले आहेत. अनेक ख्यातनाम व्यक्ती आणि सेलिब्रिटीजही आपले #MummyYaar वाले क्षण मांडत या अभियानात उत्साहाने सहभागी झाले आहेत. 9 मे 2022 पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसं दिली जातील.
कू चे प्रवक्ता म्हणाले, "मदर्स डे आपल्या प्रेमळ आईंविषयी असलेलं अथांग प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आम्हाला वाटते, की सोशल मीडिया आईंसाठी विशेष चांगली जागा आहे, असे कधी दिसत नाही. अशावेळी 'कू' सारखा एक सुरक्षित आणि यूजर-फर्स्ट मंच त्यांना आवडीच्या भाषेसह विविध खास विषयांवर मतं आणि विचार व्यक्त करण्यास सक्षम बनवतो. आम्ही #MummyYaar अभियानाच्या माध्यमातून मातृत्वाच्या भावनेला सलाम करण्याचा विचार केला. यातून लाखो आयांचा निरागसपणा, प्रेम, त्याग आणि उत्साहाला साजरं केलं जाईल. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही सतत नवनव्या गोष्टी शिकणाऱ्या, सक्रियपणे सोशल मीडियावर वावरणाऱ्या मातांचे आभार मानत आहोत. या माता सतत सोभवतालातल्या लोकांना विधायक गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरायला प्रेरित करत असतात. सगळ्या मातांना आणि भविष्यात आई होऊ पाहणाऱ्या स्त्रियांनाही मदर्स डेच्या सदिच्छा!"