WhatsApp Bug: या तरूणाला फेसबुककडून लाखों रूपयांंचं बक्षीस, कारण घ्या जाणून

सोशल सॅव्ही
Updated Jun 11, 2019 | 17:17 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

WhatsApp: सर्वात जास्त वापर करण्यात येणाऱ्या इंस्टेंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून मणिपूरच्या एका व्यक्तीनं लाखोंची कमाई केली. फेसबुकनं त्याला व्हॉट्सअॅप बग शोधून दिल्यामुळे भरघोस बक्षिस दिलं.

whats app
व्हॉट्सअॅप बग शोधणाऱ्या तरुणाला कंपनीकडून लाखोंचं बक्षिस  |  फोटो सौजन्य: BCCL

इंफाळ: सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं युजर्सची गोपनीयतेचं उल्लंघन करणारा व्हॉट्सअॅप बग शोधून काढणाऱ्या मणिपूरच्या तरूणाला बक्षिस दिलं आहे. व्यवसायानं इंजिनीअर असलेला जोनेल सोगईजाम अवघ्या २२ वर्षांचा आहे. त्यानं सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅप वरील बग शोधून काढला. त्यासाठी त्याला फेसबुकनं ५००० डॉलर म्हणजेच जवळपास (३.४७ लाख रूपयांचं) बक्षिस दिलंय. सोबतच जोनेलचा ‘फेसबुक हॉल ऑफ फेम २०१९’मध्येही समावेश करण्यात आला आहे.

जोनेल सोगईजाम यंदाच्या ‘फेसबुक हॉल ऑफ फेम’च्या ९४ जणांच्या यादीमध्ये १६व्या स्थानावर आहे. त्यानं सांगितलं, ‘व्हॉट्सअॅपद्वारे एका व्हॉइस कॉल दरम्यान हा बग कॉल रिसीव्ह करणाऱ्याची माहिती आणि मंजुरी न घेताच त्याला व्हिडिओ कॉलमध्ये अपग्रेड करत होता.’ यामुळे फोन करणाऱ्या व्यक्ती दुसरा व्यक्ती काय करतोय, हे बघू शकत होता. जे की त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन करण्यासारखंच होतं.

या बगची माहिती मिळताच जोनेलनं मार्च महिन्यात त्याची माहिती फेसबुकच्या बग बाऊंटी प्रोग्रामला दिली. हा बग बाऊंटी प्रोग्राम गोपनीयतेचं उल्लंघन करणाऱ्या प्रकरणं हाताळतात.

जोनेलनं याबाबत पुढे सांगितलं की, त्यानं दिलेली माहिती फेसबुकच्या सुरक्षा टीमनं दुसऱ्या दिवशी मान्य केली आणि फेसबुकच्या तांत्रिक विभागानं १५-२० दिवसांमध्ये हा बग हटवत सर्व काही ठीक केलं. त्यानंतर फेसबुकनं सोगईजामला एक मेल पाठवला. त्यात लिहिलं होतं, ‘या बगबद्दल तपासणी केल्यानंतर आम्ही तुम्हांला ५००० डॉलरचं बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे.’

मार्क झुकरबर्गचा मालकी हक्क असलेल्या फेसबुकनं फेब्रुवारी २०१४ मध्ये १९ अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअॅप या मॅसेजिंग अॅपची खरेदी केली होती. जोनेल पूर्वी व्हॉट्सअॅपनं नुकताच के एस अनंतकृष्णा या भारतीय विद्यार्थ्याला बक्षिस दिलं होतं. अनंतकृष्णा या १९ वर्षीय विद्यार्थ्यानं व्हॉट्सअॅपवरील एका बगचा शोध लावला होता. त्यानंतर फेसबुकनं अनंतकृष्णाला बक्षिस दिलं होतं.

दरम्यान, व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणत आहे. नुकताच व्हॉट्सअॅपनं आपल्या स्टेटसमध्ये नवीन इमोजी स्टाईल आणणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच व्हॉट्सअॅप लवकरच लँडलाईनवरूनही वापरता येणार आहे. सोबतच व्हॉट्सअॅपवरून पेमेंट सुद्धा काही काळानंतर करता येईल. एवढंच नव्हे तर फेसबुक सारखी आता व्हॉट्सअॅप स्टेटसमध्येही जाहिरात भविष्यात बघता येणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये इतके सगळे अपडेट्स देत असतांना त्यातील बग दूर करण्याकडेही कंपनीचा कल दिसून येतोय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
WhatsApp Bug: या तरूणाला फेसबुककडून लाखों रूपयांंचं बक्षीस, कारण घ्या जाणून Description: WhatsApp: सर्वात जास्त वापर करण्यात येणाऱ्या इंस्टेंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवरून मणिपूरच्या एका व्यक्तीनं लाखोंची कमाई केली. फेसबुकनं त्याला व्हॉट्सअॅप बग शोधून दिल्यामुळे भरघोस बक्षिस दिलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola