Facebook And Instagram Blue Tick : फेसबुक आणि इन्स्टाग्रामची फ्री सर्व्हिस बंद, ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार एवढे पैसे

meta follows twitter, meta launch facebook instagram paid blue tick subscriptions check price list : ट्विटर प्रमाणेच आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाइड ब्ल्यू टिक हवी असेल तर युझरला पैसे मोजावे लागणार आहेत.

Facebook And Instagram Blue Tick
फेसबुक, इन्स्टाच्या ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार एवढे पैसे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • फेसबुक, इन्स्टाच्या ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार एवढे पैसे
  • फुकटात ब्ल्यू टिक मिळणार नाही
  • या आठवड्यापासून पेड सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये सुरू होणार

meta follows twitter, meta launch facebook instagram paid blue tick subscriptions check price list : ट्विटर प्रमाणेच आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेरिफाइड ब्ल्यू टिक हवी असेल तर युझरला पैसे मोजावे लागणार आहेत. फुकटात ब्ल्यू टिक मिळणार नाही. आयफोन युझरला ब्ल्यू टिकसाठी दरमहा 14.99 डॉलर मोजावे लागतील. वेब युझरला ब्ल्यू टिकसाठी दरमहा 11.99 डॉलर मोजावे लागतील. या आठवड्यापासून पेड सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये सुरू होणार आहे. लवकरच पेड सेवा जगभर सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. 

पेड ब्ल्यू टिक युझरना त्यांच्या अकाउंटवर मोठ्या कालावधीचा व्हिडीओ तसेच एचडी क्वालिटीचा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. मेटाच्या धोरणानुसार पेड ब्ल्यू टिक युझरना मिळणाऱ्या सेवांपैकी निवडक सेवाच सामान्यांना मिळणार आहेत. तसेच पेड ब्ल्यू टिक युझरना त्यांच्या अकाउंटच्या सुरक्षेसाठी आणखी काही सुविधा मिळणार आहेत. 

Preserving History Of Forts : गड-किल्ल्यांचा इतिहास जपू : मुख्यमंत्री

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट, 2 महिन्यांचा पगार होणार

आधीपासून ब्ल्यू टिक असलेल्या युझरच्या टिक हटविल्या जाणार नाहीत. पण आता ब्ल्यू टिक हवी असल्यास पैसे मोजावे लागणार आहेत. 

मेटाचे नवे धोरण, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हेरिफाइड ब्ल्यू टिक युझर होण्यासाठी मोजावे लागणार पैसे

  1. या आठवड्यापासून पेड सेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये सुरू होणार. लवकरच पेड सेवा जगभर सुरू होणार.
  2. आयफोन युझरला ब्ल्यू टिकसाठी दरमहा 14.99 डॉलर (सुमारे बाराशे रुपये) मोजावे लागतील. वेब युझरला ब्ल्यू टिकसाठी दरमहा 11.99 डॉलर (सुमारे हजार रुपये) मोजावे लागतील.
  3. आधीपासून ब्ल्यू टिक असलेल्या युझरच्या टिक हटविल्या जाणार नाहीत. पण नव्याने ब्ल्यू टिक हवी असल्यास पैसे मोजावे लागणार.
  4. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या नव्या प्रोफाइलला ब्ल्यू टिक हवी असल्यास पैसे मोजावे लागणार. 
  5. प्रोफाइलसाठी पेड ब्ल्यू टिक असली तरी पेजसाठीची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस अद्याप सुरू झालेली नाही.
  6. पेड ब्ल्यू टिक युझरना त्यांच्या अकाउंटच्या सुरक्षेसाठी आणखी काही सुविधा मिळणार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी