Facebook Romance Fraud : मुंबई : फेसबुकसारख्या (Facebook) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फसवणुकीचे (Social Media Fraud) प्रमाण वाढत आहे. खास करून फेसबुकवर विविध प्रकारचे फ्रॉड, गुन्हे होत आहेत. फेसबुकवरील अशाच एका लैंगिक शोषणाच्या ( Mumbai Facebook sextortion case) एका प्रकरणात नुकतीच एका व्यक्तीची 12.24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली म्हणजे खंडणी वसूल करण्यात आली. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, एका टोळीने सांताक्रूझच्या 47 वर्षीय रहिवाशाला एका व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करून पैसे उकळले होते. हा तक्रारदार फेसबुकवर नुकतीच मैत्री झालेल्या एका महिलेसोबत व्हिडिओ कॉलवर होता. टोळीतील सदस्यांनी युट्युब (YouTube) आणि दिल्ली पोलिस सायबर युनिटचे अधिकारी असल्याचे दाखवले. त्यानंतर व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ काढून टाकण्यासाठी त्याला रक्कम देण्यास सांगितले. तक्रारदाराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून 12.24 लाख रुपये खंडणीद्वारे उकळण्यात आले. (Mumbai resident loses 12.24 lakh in Facebook sextortion fraud, 5 tips to remain safe)
अधिक वाचा : Internet Explorer : इंटरनेट एक्सप्लोरर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार
तक्रारदाराने प्रियंका शर्मा या फेसबुक युजरला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर हे सर्व सुरू झाले. त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर महिलेने त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली आणि नंतर तिचा व्हॉट्सअॅप नंबर शेअर केला. यानंतर सांताक्रुझ येथील तक्रारदाराने त्या युजरला त्याच रात्री तिला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओने कॉल करून तिच्याशी काही काळ बोलले. मात्र, त्याच रात्री दोघांमध्ये तीन व्हिडिओ कॉल्स झाल्याचं हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
अधिक वाचा : Cyber Fraud: थोडीशी चूक पडेल महागात! Google Pay आणि Paytm वापरत असाल तर या ५ टिप्स नक्की जाणून घ्या
अशाच एका कॉलमध्ये, ती महिला नग्न झाली होती आणि त्या तक्रारदारालादेखील कपडे काढण्यास पटवून देण्यात त्या महिलेला यश आले होते. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्या महिलेने रेकॉर्ड केला. नंतर त्या तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. त्याने मागितलेली रक्कम न दिल्यास हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची धमकी दिली, अशी माहिती समोर आली आहे.
त्या महिलेच्या मागणीनुसार तक्रारदाराने प्रथम दिलेल्या बँक खात्यात 20,000 रुपये पाठवले. तथापि, ते एवढ्यावरच थांबले नाही, कारण काही दिवसांनंतर या तक्रारदाराला दिल्ली पोलिस सायबर सेल ऑफिसर म्हणून भासवणाऱ्या टोळीतील दुसर्या सदस्याचा कॉल आला. या सदस्याने तक्रारदाराला सांगितले की त्याचा व्हिडिओ YouTube वर आहे परंतु तो प्लॅटफॉर्मच्या धोरणाचे उल्लंघन करतो. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
त्यानंतर सदस्याने यूट्यूबच्या एक अधिकारी श्रीकांतचा फोन नंबर शेअर केला. तक्रारदाराने जेव्हा त्याला फोन केला तेव्हा प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ काढून प्रकरण मिटवण्यासाठी पैसे देण्यास सांगितले. ते सर्व प्रकरण इथेच थांबले नाही. या महिलेने कथितपणे आत्महत्या केली आहे आणि ते आता त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवत आहेत, असे पोलीस अधिकारी म्हणून दाखविणाऱ्या सदस्याने तक्रारदाराला पुढे सांगितले.
या प्रकरणात नाव येऊ द्यायचे नसेल तर अधिक पैसे भरण्यास तक्रारदाराला सांगण्यात आले होते. सततच्या छळाच्या मालिकेनंतर अखेर त्यांनी सायबर पोलिसात एफआयआर दाखल केला, अशी माहिती समोर आली आहे.