ट्विटरवर मोदी नंबर वन

ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असलेला राजकीय नेता अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

narendra modi become most followed active politician on twitter
ट्विटरवर मोदी नंबर वन 

थोडं पण कामाचं

  • ट्विटरवर मोदी नंबर वन
  • ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारे जॅक मा बेपत्ता
  • ट्रम्प यांचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट कायमचे ब्लॉक

नवी दिल्ली: ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असलेला राजकीय नेता अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी यांचे ट्विटरवर ६४.७ दशलक्ष फॉलोअर आहेत आणि ते फक्त २ हजार ३४५ जणांनाच फॉलो करतात. ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय राजकीय नेत्यांमध्येही पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत. (narendra modi become most followed active politician on twitter)

ट्विटरवरील नोंदीननुसार नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २००९ मध्ये ट्विटरवर अकाउंट सुरू केले. अकाउंट सुरू केले त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सध्या ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत. 

कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याची तयारी होत आहे. तसेच अनेक देशांना थेटपणे तर काही देशांना जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी लस पुरवठा करण्याची योजना भारत आखत आहे. यामुळे कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारत जगाचा लस पुरवठादार देश होण्याची चिन्ह आहेत. जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढत असतानाच पंतप्रधान मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असलेली राजकीय व्यक्ती झाले आहेत.

ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारे जॅक मा बेपत्ता

मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडिया विश्वात अनेक खळबळजनक घटना घडल्या. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारे बलाढ्य चिनी उद्योगपती जॅक मा बेपत्ता आहेत. त्यांचे शेवटचे ट्वीट १० ऑक्टोबर २०२०चे आहे. बेपत्ता जॅक मा यांच्याविषयी चीन सरकारने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. 

ट्रम्प यांचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट कायमचे ब्लॉक

चीनमधील रहस्याचा उलगडा होण्याआधीच नवे धक्कादायक वृत्त आले. अॅपद्वारे डेटा मिळवून त्याचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या आठ अॅपवर बंदी घातली. अॅपवरील कारवाई नंतर ट्रम्प यांनी अंतर्गत राजकारणात आपला विरोध प्रकट करण्यासाठी संसदेवर हल्ला करण्याकरिता चिथावणी देण्याचा चुकीचा प्रकार केला. या घटनेनंतर ट्रम्प यांचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट कायमचे ब्लॉक करण्यात आले. सोशल मीडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका प्रभावी राजकीय व्यक्तीची अकाउंट कायमची ब्ल़ॉक करण्याचा प्रकार घडला. 

तांत्रिक सेवा पुरवणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पक्षपात

जो सोशल मीडिया व्यक्त होण्याची संधी देतो तोच मीडिया व्यक्त होण्याची संधी नाकारत असल्याचे ट्रम्प यांच्या बाबतीत दिसले. विशेष म्हणजे कायद्यांना, सरकारला, सरकारी यंत्रणेला विरोध करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चिथावणी देणाऱ्यांची सोशल मीडिया अकाउंट अॅक्टिव्ह असताना ट्रम्प यांच्या संदर्भात अकाउंट ब्लॉक करण्याचा निर्णय झाला आहे. याआधी आम्ही तांत्रिक सेवा पुरवणारे उद्योजक आहोत, आक्षेपार्ह काय ते आम्ही ठरवू शकत नाही, अशी भूमिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या निर्मात्यांनी घेतली होती. पण त्यांनी वेगाने भूमिका बदलली. आता तर एका देशाच्या सर्वोच्च नेत्याचे आक्षेपार्ह कंटेंट हटवल्यानंतर त्याचे अकाउंट ब्लॉक करण्यापर्यंत सोशल मीडियाची मजल गेली आहे. संबंधिताला बाजू मांडण्याची संधीच नाकारण्यात आली आहे. 

सोशल मीडियावरुन वैचारिक संघर्ष

सोशल मीडियाच्या मुद्यावरुन नव्या वैचारिक संघर्षाला तोंड फुटले आहे. हा संघर्ष सुरू असतानाच पंतप्रधान मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असलेली राजकीय व्यक्ती झाले आहेत. नरेंद्र मोदी यांना आधी अनेक देशांनी हिंसेला प्रोत्साहन देणारा नेता ठरवले होते. बाजू मांडण्याची संधी नाकारत अनेक देशांनी मोदींना प्रवेश नाकारला होता. यात अमेरिका हा देश पण होता. आज त्याच अमेरिकेतून हाताळल्या जाणाऱ्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी सर्वाधिक फॉलेअर असलेले नंबर वन नेता झाले आहेत.

ओबामांचे फॉलोअर जास्त, पण....

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर १२ कोटी ७९ लाख फॉलोअर आहेत. पण ओबामा सध्या कोणत्याही राजकीय पदावर नाहीत. याच कारणामुळे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असलेला राजकीय नेता अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी