Whatsapp प्रोफाईल फोटोमध्ये दिसेल नवा अवतार, व्हॉट्सअॅपचे नवे अपडेट

New avatar will appear in Whatsapp profile photo, new update of WhatsApp : संवाद साधण्याचे माहिती शेअर करण्याचे लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे अॅप अशी व्हॉट्सअॅपची ख्याती आहे. या व्हॉट्सअॅपने युझर्समधील त्यांची लोकप्रियता आणखी वाढावा या उद्देशाने व्हर्जन अपडेट केले आहे.

New avatar will appear in Whatsapp profile photo, new update of WhatsApp
Whatsapp प्रोफाईल फोटोमध्ये दिसेल नवा अवतार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Whatsapp प्रोफाईल फोटोमध्ये दिसेल नवा अवतार
  • व्हॉट्सअॅपचे नवे अपडेट
  • व्हॉट्सअॅपने युझर्समधील त्यांची लोकप्रियता आणखी वाढावा या उद्देशाने व्हर्जन अपडेट केले

New avatar will appear in Whatsapp profile photo, new update of WhatsApp : संवाद साधण्याचे माहिती शेअर करण्याचे लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे अॅप अशी व्हॉट्सअॅपची ख्याती आहे. या व्हॉट्सअॅपने युझर्समधील त्यांची लोकप्रियता आणखी वाढावा या उद्देशाने व्हर्जन अपडेट केले आहे. अँड्रॉईड व्हॉट्सअॅप बीटा (WhatsApp beta for Android!) च्या 2.22.22.16 या व्हर्जनमध्ये अवतार Avatar हा नवा पर्याय Settings मध्ये दिसत आहे. अवतार या पर्यायाद्वारे युझर स्वतःचा एक आकर्षक अवतार तयार करून प्रोफाईल फोटो म्हणून वापरू शकेल. अवतार तयार करण्यासाठी अनेक फीचर्स व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिली आहेत. 

मोठी बातमी ! 10 हजारांहून अधिक किमतीचे 4G स्मार्टफोन बंद होणार, पण काय आहे कारण?

Facebook Bug : Facebook वर अचानक कमी झाले फॉलोअर्स, झुकरबर्गच्याही फॉलोअरमध्ये मोठ्या प्रमाणात घट

डिजिटल स्वरुपातले रूप किंवा डिजिटल एक्सप्रेशनचे स्टिकर्स  म्हणजे अवतार असे म्हणता येईल. हा अवतार प्रोफाईल फोटो म्हणून वापरता येईल. @WABetaInfo या ट्विटर हँडलवर व्हॉट्सअॅपने बीटा व्हर्जनच्या अपडेटबाबत माहिती दिल आहे. जे युझर हे व्हर्जन वापरतात ते अवतार हा पर्याय वापरून बघू शकतात. आपण सामान्य व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि बीटा व्हर्जन करून घ्यायचे असेल गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप टाइप करा. व्हॉट्सअॅप नावाचे अॅप दिसेल जे आधीपासूनच आपल्या मोबाईलमध्ये असल्यामुळे इन्स्टॉल्ड असा शब्द पण आपल्याला दिसेल. आता याच व्हॉट्सअॅपवर प्ले स्टोअरमध्ये क्लिक करा आणि थोडे स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी व्हॉट्सअॅप बीटा प्रोग्रॅमध्ये सहभागी होण्याचा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा. थोड्याच वेळात आपल्या फोनवर व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन अॅक्टिव्हेट होईल. अँड्रॉईड व्हॉट्सअॅप बीटा (WhatsApp beta for Android!) च्या 2.22.22.16 या व्हर्जनमध्ये अवतार Avatar हा नवा पर्याय Settings मध्ये दिसेल. हा पर्याय आपण वापरून बघू शकता. मग वाट कसली बघताय... चला लगेच व्हॉट्सअॅप अपडेट करा. 

लवकरच व्हॉट्सअॅप आणखी एक फीचर लाँच करणार आहे. यामुळे ज्यांनी View Once हा पर्याय निवडून मेसेज, फोटो, व्हिडीओ असे काही पाठवले असेल त्यांच्या संदेशांचा स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी