आपले प्रायव्हेट मेसेज आपोआप डिलीट होणार, WhatsApp वर नवं फीचर 

Whatsapp New Feature: व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर रिलीज करणार आहे ज्यानंतर तुमचं खासगी चॅट आणखी सुरक्षित होईल. या नवीन आणि विशेष फीचरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

new feature of self destruct timer on whatsapp will automatically delete private messages
आपले प्रायव्हेट मेसेज आपोआप डिलीट होणार, WhatsApp वर नवं फीचर   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचं चॅटिंग लवकरच आणखी सुरक्षित होणार आहे. त्यामुळे यापुढे आपण निसंकोचपणे काही खाजगी संदेश पाठवू शकतात.  गूगल प्ले स्टोअरमध्ये नुकत्याच आलेल्या एका अॅपच्या बीटा व्हर्जनमधून असं समोर आलं आहे की,  व्हॉट्सअॅप आपल्याला खाजगी चॅट हटविण्यासाठी  स्वयंचलितपणे टाइमर सेट करण्यास अनुमती देईल. WABetaInfo जारी केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे.

या माहितीनुसार, गेल्या ऑक्टोबरमध्ये ही सुविधा केवळ ग्रुप मेसेजवर देण्यात आली होती. परंतु आता हा पर्याय लवकरच व्हॉट्सअ‍ॅपकडून पर्सनल चॅटिंगवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे आपण एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एक वर्षानंतर सेल्फ डिस्ट्रक्टसाठी मेसेजची सेटिंग करू शकता.

तथापि, ते फेसबुक मेसेंजर आणि टेलिग्रामवर उपलब्ध असलेल्या पर्यायांपेक्षा हा बराच वेगळा पर्याय असणार आहे. हा पर्याय अधिक सोपा आणि चांगला असेल अशी अपेक्षा आहे.

हा फीचर यूजर्संना फोनमध्ये सेव्ह कॉन्टॅक्टसाठी वेगवेगळं प्रायव्हेट चॅट करण्याची परवानगी देतं.  आपण संदेश किती काळ ठेवायचा यावर देखील आपलं नियंत्रण असणार आहे. सध्या कोणत्याही एका मेसेजवर टाईमर लावण्यासाठी व्हॉट्सअॅपवर पर्याय नाही, पण लवकरच हे फीचर सार्वजनिकपणे उपलब्ध होईल आणि प्रत्येकजण त्याचा वापर करु शकतो.  

संवेदनशील विषयांसाठी हा एक स्वागतार्ह पर्याय आहे. कारण लोकांना काहीवेळा खाजगी मेसेज पाठविण्यास भीती वाटते. त्यांना व्हॉट्सअॅप एन्क्रिप्शनवर देखील भरोसा नसतो. पण या नव्या पर्यायाच्या मदतीने असं होऊ शकतं की,  
दुसर्‍या व्यक्तीला पाठवलेला खासगी मेसेज त्या व्यक्तीने वाचल्यानंतर, जर दुसर्‍याच्या कुणाच्या हातात त्या व्यक्तीचा फोन आला तर, ती व्यक्ती ते खाजगी मेसेज वाचू शकणार नाही. कारण तोपर्यंत तो मेसेज डिलीट झालेला असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...