आता व्हॉट्सअॅपवरून बिनधास्त करा शॉपिंग

सोशल सॅव्ही
Updated Nov 10, 2020 | 12:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

इस्टंट मेसेजिंग अॅपने नवे फीचर रोलआऊट केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर बिझनेसही करू शकता.

whatsapp
आता व्हॉट्सअॅपवरून बिनधास्त करा शॉपिंग 

थोडं पण कामाचं

  • WhatsAppच्या फीचरच्या माध्यमातून सर्व व्हॉट्सअॅप बिझनेस अकाऊंट युजर्स सरळ आपल्या ग्राहकांना प्रॉडक्टचा कॅटलॉग देऊ शकतात
  • WhatsAppचे हे नवे फीचर भारतातील छोटया छोट्या व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. 
  • यासाठी युजर्सला सिंपल चॅटिंगची मदत घ्यावी लागेल

मुंबई:  इस्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन WhatsAppने आपले नवे फीचर रोलआऊट केले आहे. हे व्हॉट्सअॅप बिझनेस नावाने ओळखले जात आहे. याच्या मदतीने युजर्स सामानाची खरेदी चॅटिंगच्या मदतीने करू शकतात. यासाठी युजर्सला सिंपल चॅटिंगची मदत घ्यावी लागेल. यासोबतच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्टची संपूर्ण माहिती मिळवू शकाल. 

रिपोर्टनुसार नव्या WhatsAppच्या फीचरच्या माध्यमातून सर्व व्हॉट्सअॅप बिझनेस अकाऊंट युजर्स सरळ आपल्या ग्राहकांना प्रॉडक्टचा कॅटलॉग देऊ शकतात. यासाठी WhatsAppवर शापिंगचे एक बटन जोडले जाईल. WhatsAppच्या या शॉपिंग बटनामध्ये युजर्स आपले प्रॉडक्ट अॅड करत जातील आणि ते सरळ कस्टमरच्या डिस्प्लेवर दिसतील. हे तुम्ही व्हॉट्सअॅपच्या चॅटद्वारे करू शकता. WhatsAppचे हे नवे फीचर भारतातील छोटया छोट्या व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. 

WhatsAppकडून काहीच दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली की कंपनी WhatsApp business app साठी काही चार्ज बिझनेसमनकडून घेऊ शकते. दरम्यान, facebook कडून अद्याप घोषणा झालेली नाही. याचाच अर्थ बिझनेसमनला काही सर्व्हिससाठी पैसे द्यावे लागतील. तर कस्टमरसाठी हे अॅप फ्री असेल. 

व्हॉट्सअॅपववरून पाठवता येणार पैसे

व्हॉट्सअॅपच्या आतापर्यंत आपण मेसेजेस(messages) पाठवू शकत होतो.मात्र आता तुम्ही याद्वारे पैसेही पाठवू शकता. मेसेजिंग अॅपच्या माहितीनुसार लोक सुरक्षित पद्धतीने कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पैसे पाठवू शकतात. तसेच रोख व्यवहार करण्यासाठी तसेच स्थानिक बँकेत न जाता दूर राहूनही वस्तुंच्या किंमती शेअर करू शकतात.

७ दिवसांत गायब होणार मेसेज

WhatsAppमध्ये केलेले चॅटिंग पर्सनल राखण्याच्या दृष्टीने कंपनीने Disappearing Messageची सुरूवात केली आहे.जेव्हा Disappearing Message ऑन असेल तेव्हा या दरम्यान केलेले चॅट्सचे सर्व मेसेजेस सात दिवसांच्या आत दिसेनासे होतील. केवळ एकाशी चॅटिंग करताना तुम्ही दोघांपैकी कोणीही Disappearing Message ला ऑन अथवा ऑफ करू शकता. दरम्यान ग्रुप्समध्ये हा पर्याय केवळ अॅडमिनकडे असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी