मुंबई: सध्याचा जमाना ऑनलाईनचा(online) आहे. सणांच्या दिवसांत हल्ली आपल्या जवळच्या व्यक्तींना ऑनलाईन गिफ्ट(online gift) पाठवले जाते. यातच तुम्ही आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तींना ऑनलाईन गोल्ड गिफ्ट(online gold gift) करू शकता. तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे? डिजीटल गोल्ड खरेदी करण्याचे अथवा गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. यातच एक प्लॅटफॉर्म सेफगोल्ड आहे.
ज्यांना सोन्याच्या सुरक्षिततेची काळजी न करता सोने खरेदी अथवा जमा करायचे आहे त्यांच्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. यात पेटीएम आणि फोन पे सारख्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी झाली आहे. सेफगोल्ड हा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे जो ग्राहकांना २४ तास कमी टिकट साईजमध्ये २४ कॅरेट सोन्याची खरेदी, विक्री आणि डिलीव्हरीची सुविधा देते. यासोबतच व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला पैसे पाठवणेही शक्य आहे.
आपल्या खात्यात लॉग इन केल्आनंतर तुम्हाला डॅशबोर्डवर गिफ्ट या पर्यायावर क्लिक करून सोन्याचे गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला ज्यांना सोन्याचे गिफ्ट द्यायचे आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि सोन्याची किंमत टाकावी लागेल. तसेच यासोबत तुम्हाला काही मेसेज अथवा स्टिकर जोडायचा आहे तोही तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही आतापर्यंत सोने खरेदी केले नसेल तर तुम्हाला गिफ्ट बनवण्यासाठी काही सोने खरेदी करावे लागेल. दरम्यान, तुम्ही स्वत:ला स्वत:च गिफ्ट करू शकत नाही.
ज्यांना सोने दिले जाणार आहे त्या व्यक्तीला एका कालावधीदरम्यान एका लिंकसोबत एसएमएस पाठवला जाईल. तसेच त्या व्यक्तीने आपल्या सेफगोल्ड खात्यावर लॉग इन करून त्या वेळेमध्ये सोन्यावर दावा करतात. तुम्ही व्हॉट्सअॅप अथवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लिंक पाठवू शकता. सेफगोल्डद्वारे तुम्ही अशा व्यक्तीला सोने पाठवू शकता ज्यांच्याकडे लिंकच्या माध्यमातून सेफगोल्ड खाते नाही. मिळणाऱ्या व्यक्तीला त्याचा मोबाईल नंबर दाखल करावा लागेल आणि ओटीपीला सोन्याचा दावा करण्यासाठी गिफ्टमध्ये देण्यात आला आहे.