१ अब्जहून अधिक  Android फोनला हॅकिंगची धोका! 

Android devices: जगभरातील बरेच लोक Android स्मार्टफोन वापरतात. पण आता अनेक अँड्रॉईड फोनला हँकिंगचा धोका असल्याचं समोर आलं आहे. 

over 1 billion android phones are prone to hacking 
१ अब्जहून अधिक  Android फोनला हॅकिंगची धोका!   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: अँड्रॉइड स्मार्टफोनच्या यूजर्ससमोर एक मोठा धोका निर्माण झाला आहे. Android स्मार्टफोन आणि टॅब्लेट यूजर्सचा डेटा पुन्हा हॅक होण्याचा एक मोठा धोका असल्याचे समजतं आहे. अलीकडेच सायबर सिक्युरिटी फर्मने गुगलसह अँड्रॉइड स्मार्टफोन कंपन्यांना सॉफ्टवेअर अपडेट्सबाबत यूजर्ससोबत पारदर्शक राहण्यास सांगितले आहे. यासह या एजन्सीने त्यांच्या सॉफ्टवेअर अपडेट्सबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

अलीकडे सायबर सिक्युरिटी फर्म Which? ने असा दावा केला आहे की, जगभरातील १ अब्जहून अधिक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये त्रुटी आहेत. त्यांच्या मते, या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जात नाहीत, ज्यामुळे ते सहजपणे हॅक होऊ शकतात. त्यांनी यासंदर्भात एक निवेदन केले की, स्मार्टफोन बनवणाऱ्या या कंपन्या स्पष्टपणे सांगत नाही की, या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड अपडेट यूजर्सला किती काळ मिळेल हे स्पष्टपणे सांगत नाहीत. बर्‍याच अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये दोन ते तीन वर्षानंतरच अपडेट मिळणं बंद होतं.

Which च्या मते, जगभरात ४० टक्के Android यूजर्सला यापुढे Google ऑपरेटिंग सिस्टमकडून सुरक्षा अपडेट मिळत नाहीत.  यामुळे त्यांना डेटा चोरी, खंडणीची मागणी आणि मालवेअर हल्ल्याचा धोका आहे. तज्ज्ञांनी बरेच फोन आणि टॅब्लेट निवडले आणि हे सहजपणे हॅक होऊ शकतात असं त्यांना आढळून आलं. संशोधकांनी बर्‍याच स्मार्टफोनची चाचणी केली आहे. ज्यामध्ये सॅमसंग, सोनी आणि एलजी / गुगलच्या मॉडेल्ससह अनेक फोन समाविष्ट आहेत.

चाचणी केल्यानंतर, संशोधकांना असे आढळले की हे फोन सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. जर आपल्या फोनमध्ये अँड्रॉइड ६ किंवा जुने सॉफ्टवेअर असल्यास आणि कोणतीही नवीन अपडेट मिळत नसल्यास, आपण हॅकिंगपासून वाचण्यासाठी नवा  फोन घेऊ शकतात. म्हणजेच नवा फोन घेण्याशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. पण जर  आपण नवीन फोन घेत नसल्यास स्मार्टफोन वापरताना आपल्याला बरीच सावधगिरी बाळगावी लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी