Paytm back on Google play: काहीच तासांमध्ये गूगल प्लेवर पेटीएमचे पुनरागमन, गूगलने आपला निर्णय बदलला

सोशल सॅव्ही
Updated Sep 19, 2020 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

सट्टेबाजीप्रकरणि गूगलने आपल्या प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप काढून टाकले होते. पण काही तासांतच पेटीएमने ट्विटरवरून सांगितले की वुई आर बॅक.

Paytm app
काहीच तासांमध्ये गूगल प्लेवर पेटीएमचे पुनरागमन, गूगलने आपला निर्णय बदलला 

थोडं पण कामाचं

  • आधी आली गूगल प्लेस्टोअरवरून पेटीएम हटवल्याची बातमी
  • सट्टेबाजीचा आरोप लावण्यात आल्याने गूगलने प्ले स्टोअरवरून हटवले होते अॅप
  • काही तासातच पेटीएमने ट्विटरवरून केली पुनरागमनाची घोषणा

नवी दिल्ली: गूगल प्लेस्टोअरवरून (Google Play Store) हटवण्यात (removal) आल्यानंतर काही तासांतच पेटीएमने (Paytm) गूगल प्ले स्टोअरवर पुनरागमन (comeback on Play Store) केले. कंपनीने ट्विटरवरून (message through Twitter) संदेश दिला की आता ते आपल्यासोबत आहेत (back in service). पेटीएमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (official Twitter handle) ट्वीट केले की वुई आर बॅक (‘We are back’). या ट्वीटनंतर पेटीएमच्या ग्राहकांचा जीव (customers relieved) भांड्यात पडला आहे. अनेकांनी या ट्वीटला उत्तर देताना पेटीएमचे स्वागत केले आहे.

आधी आली गूगल प्लेस्टोअरवरून पेटीएम हटवल्याची बातमी

१८ सप्टेंबर रोजी गूगल प्लेने भारतात आपली तीन वर्षे पूर्ण केली. आजपासून तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७मध्ये गूगल प्ले अॅप लाँच करण्यात आला होता. महत्वाची गोष्ट अशी की गूगलने याच दिवशी पेटीएमवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून सांगण्यात आले होते की पेटीएम हे गूगलच्या पॉलिसीजच्या विरोधात काम करत होते, ज्यामुळे त्यांना आधी नोटिस पाठवली होती आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पेटीएमवर सट्टेबाजीचा आरोप लावण्यात आला होता.

हा अॅप गूगल स्टोअरवरून हटवल्याच्या या कारवाईनंतर नव्या यूजर्सना हा अॅप डाऊनलोड करता येत नव्हता आणि जुने ग्राहक याला अपडेट करू शकत नव्हते. पेटीएम ग्राहकांना सर्वात मोठी धास्ती होती ती त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेची जो विशेषतः पेटीएम बँक किंवा पेटीएम वॉलेटमध्ये होती. पण आता पेटीएमकडून सांगण्यात आले आहे की ग्राहकांना घाबरण्याची आवश्यकता नाही आणि सर्वांचे पैसे सुरक्षित आहेत.

का करण्यात आली होती कारवाई?

गूगल प्लेस्टोअरच्या नियमांप्रमाणे अशी कुठलीही साईट किंवा अॅप जो ऑनलाईन कॅसिनोज किंवा अनियमित सट्टेबाजीत सहभागी होण्यासाठी यूजर्सना परवानगी देतो तो गूगल प्लेस्टोअरवर राहू शकत नाही. त्याचप्रमाणे असे अॅप्स जे ग्राहकांना काही बाहेरच्या संकेतस्थळांवर जाण्याची लिंक देतात ज्या अशाप्रकारची सट्टेबाजी करतात त्यांच्यावरही बंदी आहे. खरा पैसा लावून खेळले जाणारे आणि खऱ्या पैशाच्या स्वरूपात बक्षिसे देणारे कोणतेही संकेतस्थळ किंवा अॅप गूगल प्लेस्टोअरवर असणे हे गूगलच्या पॉलिसीजचे उल्लंघन आहे. गूगलकडून सांगण्यात आले आहे की पेटीएमने थेट अशाप्रकारच्या गतिविधींमध्ये भाग घेतला नसला तरी त्यांच्या अॅपवर काही संकेतस्थळे अशी होती जी अनियमित सट्टेबाजीच्या क्षेत्रात होती. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी