smart glass स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच पाठोपाठ आला स्मार्ट चष्मा

people can send and receive messages via smart glass स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच पाठोपाठ आता स्मार्ट चष्मा आला आहे. या स्मार्ट चष्म्यातून संदेशांची देवाणघेवाण सहज शक्य आहे. मेसेजिंग एकदम सोपे होणार आहे.

people can send and receive messages via smart glass
स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच पाठोपाठ आला स्मार्ट चष्मा 
थोडं पण कामाचं
  • स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच पाठोपाठ आला स्मार्ट चष्मा
  • रे बॅन स्मार्ट ग्लासचे (Ray-Ban smart glass) सॉफ्टवेअर केले अपडेट
  • स्मार्ट ग्लासमध्ये फेसबुक मेसेंजरच्या मर्यादीत सुविधांचा समावेश

people can send and receive messages via smart glass नवी दिल्ली: स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच पाठोपाठ आता स्मार्ट चष्मा आला आहे. या स्मार्ट चष्म्यातून संदेशांची देवाणघेवाण सहज शक्य आहे. मेसेजिंग एकदम सोपे होणार आहे. माणसं स्मार्ट चष्म्यातून एकमेकांकडे बघत संदेशांची देवाणघेवाण करू शकतील. संदेशांची देवाणघेवाण सुरू असतानाच स्मार्ट चष्मा घालून इतर कामंही करू शकतील. मेटा (META) कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली. 

रे बॅन स्मार्ट ग्लासचे (Ray-Ban smart glass) सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले आहे. यात फेसबुक मेसेंजरच्या मर्यादीत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे स्मार्ट चष्म्यातून संदेशांची देवाणघेवाण सहज शक्य होणार आहे. संदेश वाचणे आणि ऐकणेही शक्य होणार आहे.

रे बॅन स्मार्ट ग्लासच्या मदतीने मेसेज, फोटो, व्हिडीओ यांची निर्मिती करणे आणि ते फेसबुक, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करणे अथवा या प्लॅटफॉर्मवरुन सेंड करणे शक्य होईल. यामुळे सोशल मीडिया क्षेत्रात नवी क्रांती होईल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

याआधी गूगल ग्लास हा एक स्मार्ट चष्मा बाजारात आला. या चष्म्यातून गेम खेळणे, व्हिडीओ बघणे गूगलच्या निवडक सेवा वापरणे शक्य आहे. पण किंमतीमुळे आजही गूगल ग्लास हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेला नाही. यामुळे रे बॅन स्मार्ट ग्लास किती प्रमाणात लोकप्रिय होईल याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रे बॅन स्मार्ट ग्लासच्या किंमतीची सुरुवात २९९ अमेरिकन डॉलर पासून पुढे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी