PUBG Lite: पबजी लाइट भारतात उपलब्ध, असा करा डाऊनलोड

PUBG Lite Download: पबजी प्लेअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही भारतात पबजी लाइट गेम डाऊनलोड करू शकता. हे पूर्णपणे मोफत आहे. जाणून घ्या कसा डाऊनलोड करू शकता पबजी लाइट. 

PUBG lite
PUBG Lite: पबजी लाइट भारतात उपलब्ध, असा करा डाऊनलोड  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबईः पबजी खेळाचे प्लेअर्ससाठी एक चांगली बातमी आहे. प्लेअर अननोन बॅटलग्राऊंडचं लाइट व्हर्जन भारतात लॉन्च झालं आहे. पबजी लाइट ४ जुलै रोजी लॉन्च झालं आहे. गेमसाठी रजिस्ट्रेशन गेल्या महिन्याच्या २० तारखेपासून सुरू झालं होतं. जर का तुम्ही रजिस्ट मिस केलं असेल तर तुम्ही बीटा टेस्टिंगसाठी आजपासून रजिस्टर करू शकता. रजिस्टर्ड यूजर्सला या गेममध्ये काही खास फीचर एक्सेस करायला मिळणार आहे. यात यूजर्सला टायगर फिनिश एम416 स्किन आणि एक चीता पॅटर्न पॅरासूट स्कीन मिळेल. 

दरम्यान पबजी लाइट डेव्हलपर्स, भारतात यूजर्ससाठी पबजी लाइटच्या लॉन्चिंगच्या आधीच हे डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान करत आहेत. सध्या पबजी लाइटचं सर्व्हर अंडर मेंटेनेंस आहे. तसंच काम पूर्ण झाल्यानंतर गेम पुन्हा सुरू होईल. भारतात पबजी लाइटनं २ लाखांहून जास्त प्री रजिस्ट्रेशनचा आकडा पार केला आहे. याचा अर्थ आहे की, ज्या यूजर्संनी बीटा टेस्टिंग सर्किलमध्ये भाग घेतला आहे. त्यांना ६ अतिरिक्त रिवार्ड मिळतील. 

असा डाऊनलोड करू शकता तुम्ही पबजी लाइट

  1. सर्वांत आधी पबजीच्या अधिकृत वेबासाईटवर जा. 
  2. वेबासाईटवर गेल्यावर तुम्हांला पबजी लाइट लॉन्चर मिळेल ते डाऊनलोड करा. 
  3. पबजी लाइट लॉन्चर इंस्टॉल करा आणि गेमच्या बीट व्हर्जन इंस्टॉल करण्यासाठी क्लिक करा. 

पबजी लाइट पबजीचं फ्री व्हर्जन आहे. ज्यामुळे यूजर्स कॉम्प्युटर आणि पीसीवर खेळू शकतात. सध्या पबजी मोबाइल व्हर्जन फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. जे स्मार्टफोनवर डाऊनलोड केलं जाऊ शकतं. हे अॅप प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोर या दोन्हीवर उपलब्ध आहे. 

पबजी लाइट सध्या काही देशांमध्येच डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. भारतात पबजी लाइट हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त अनेक भाषांच्या पर्यायासोबत उपलब्ध होईल. भारतासोबतच पबजी लाइट अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये सुद्धा जारी होईल. पबजी लाइट काही देशांमध्ये उपलब्ध होईल, मात्र सर्व देशांमध्ये प्री डाऊनलोडींगची सुविधा मिळणार नाही. याआधी पबजी लाइटनं आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर भारतात लॉन्चिंग संदर्भातलं स्पष्टिकरण दिलं होतं. पबजी लाइटनं लिहिलं की, पबजी लवकरच भारतात उपलब्ध होईल हे सांगण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत.

पबजी लाइट डाऊनलोड करण्यासाठी पीसीमध्ये कमीत कमी 2.4 गीगाहर्ट्जचा कोअर आय3 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज असलं पाहिजे. पीसीमध्ये इंटेल एचडी ग्राफिक 4000 असणं आवश्यक आहे. पबजीच्या उलट पबजी लाइट व्हर्जन तुम्ही फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
PUBG Lite: पबजी लाइट भारतात उपलब्ध, असा करा डाऊनलोड Description: PUBG Lite Download: पबजी प्लेअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही भारतात पबजी लाइट गेम डाऊनलोड करू शकता. हे पूर्णपणे मोफत आहे. जाणून घ्या कसा डाऊनलोड करू शकता पबजी लाइट. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola