WhatsApp वर कोणी आपल्याला Block केले आहे की नाही ते समजून घेणे झाले सोपे

quick tips to know if someone blocked you on WhatsApp : WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला कोणालाही WhatsApp वर ब्लॉक वा अनब्लॉक करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच आपल्याला कोणी WhatsApp वर ब्लॉक केले आहे का हे तपासण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला WhatsApp वर उपलब्ध आहे.

quick tips to know if someone blocked you on WhatsApp
WhatsApp वर कोणी आपल्याला Block केले आहे की नाही ते समजून घेणे झाले सोपे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • WhatsApp वर कोणी आपल्याला Block केले आहे की नाही ते समजून घेणे झाले सोपे
  • WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला कोणालाही WhatsApp वर ब्लॉक वा अनब्लॉक करण्याचे स्वातंत्र्य
  • आपल्याला कोणी WhatsApp वर ब्लॉक केले आहे का हे तपासण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला WhatsApp वर उपलब्ध

quick tips to know if someone blocked you on WhatsApp : WhatsApp मुळे शब्द, इमोजी, image, video, audio यांच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करणे आणि संवाद साधणे सोपे झाले आहे. जगाच्या कोणत्याही भागात असलात तरी WhatsApp मुळे एकमेकांशी सहज संवाद साधू शकता. जगभरात कुठेही असलेल्या व्यक्तीशी Video Call करणेही सोपे झाले आहे. एवढ्या सोयीसुविधा पुरविणारे WhatsApp आपल्याला कोणालाही ब्लॉक करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. 

एखादी व्यक्ती आपल्या मेसेज पाठवत असेल आणि ते मेसेज आपल्याला आक्षेपार्ह वाटले अथवा संबंधित व्यक्तीचे वागणे-बोलणे आक्षेपार्ह वाटले तर आपण त्या व्यक्तीला WhatsApp वर ब्लॉक करू शकता. आपण स्वतःच्या WhatsApp वर कोणाला ब्लॉक करावे आणि कोणाला करू नये तसेच ब्लॉक केलेल्यांपैकी कोणाला अनब्लॉक करावे याचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात. 

गुलाबाच्या पाकळ्या करतील तुम्हाला ताज्यातवान्या

प्रत्येकाने बघावे असे आशियातील 7 धबधबे

WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला कोणालाही WhatsApp वर ब्लॉक वा अनब्लॉक करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच आपल्याला कोणी WhatsApp वर ब्लॉक केले आहे का हे तपासण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला WhatsApp वर उपलब्ध आहे.

भारतातील 7 प्राचीन मंदिरे

जगातील सर्वाधिक श्रीमंत 7 राजेशाही घराणी

  1. जर एखाद्याने WhatsApp वर आपल्याला ब्लॉक केले असेल तर  आपण त्याला मेसेज पाठवला तरी फक्त सिंगल टिक दिसेल. मेसेज पोहोचल्यावर दिसणाऱ्या दोन टिक आणि वाचला/बघितला/ऐकला गेल्यावर दिसणाऱ्या तीन टिक दिसणार नाही.
  2. जर एखाद्याने WhatsApp वर आपल्याला ब्लॉक केले असेल तर आपण त्याला मेसेज पाठवला तरी समोरून प्रतिसाद येणार नाही. तसेच संबंधित व्यक्तीचा DP आपल्याला दिसणार नाही. । अपवाद : एखाद्याने DP ठेवला नसेल अथवा WhatsApp वरून संबंधित दोन व्यक्तींचा संवाद अनेक दिवसांत झाला नसेल तर लगेच DP दिसत नाही. । महत्त्वाचे : एखाद्या मोबाईल नंबरचे WhatsApp अकाउंट डीअॅक्टिव्हेट केले असल्यास त्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज पोहोचणार नाही तसेच संबंधित नंबरच्या आधारे सर्च केल्यास WhatsApp वरील त्या नंबरशी संलग्न DP दिसणार नाही
  3. जर एखाद्याने WhatsApp वर आपल्याला ब्लॉक केले असेल तर आपल्याला ब्लॉक करणाऱ्या व्यक्तीचे लास्ट सीन (शेवटी WhatsApp कधी बघितले ते), स्टेटस आणि प्रोफाईल दिसणार नाही
  4. जर एखाद्याने WhatsApp वर आपल्याला ब्लॉक केले असेल तर आपण ब्लॉक करणाऱ्याला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करू शकणार नाही.
  5. जर एखाद्याने WhatsApp वर आपल्याला ब्लॉक केले असेल तर आपण ब्लॉक करणाऱ्याला कॉल करू शकणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी