तुम्ही Whatsapp अपडेट केले नसेल तर चोरी होऊ शकतो तुमचा पर्सनल डाटा

सोशल सॅव्ही
Updated May 20, 2019 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

WhatsApp Update: व्हॉट्सअॅप तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आले आहे. व्हाॅट्सअॅपने आपल्या युजर्सना अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या व्हॉटस्अॅप कसे अपडेट करू शकता.

WhatsApp Update
व्हाॅट्सअॅपचा सेक्युरिटी अपडेट 

मुंबईः जर तुम्ही व्हाॅट्सअॅप युजर असाल तर व्हॉट्सअॅप तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आले आहे. प्रत्येक युजरला हे अपडेट करण्याचा सल्ला व्हाॅट्सअॅपकडून दिला जात आहे. आपल्या मोबाईल डाटा सुरक्षेसंबंधी हा अपडेट आहे. कारण, व्हाॅट्सअॅपवरून आपली माहिती चोरी होऊ शकते. आपल्या फोनमधील गोपनीय माहिती चोरी होऊ नये यासाठी हे अपडेट करणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. व्हाॅट्सअॅप सिक्युरिटीमध्ये तांत्रिक कमतरता असल्यामुळे हॅकर्स तुमच्या मोबईल मध्ये नकळत एक असे अॅप इंस्टाॅल करतात ज्याद्वारे तुमच्या फोनमधील सगळी माहिती हॅकर्स चोरू शकतात, या सुरक्षेतील कमतरतेबाबत व्हाॅट्सअॅप टीमला कळताच त्यांवर उपाय म्हणून हा नवीन अपडेट देण्यात आला आहे.

व्हाॅट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये प्रतिस्पर्धी कंपन्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हाॅट्सअॅप कंपनीच्या प्रवक्त्यांनी मेलद्वारे यावर स्पष्टीकरण दिले, ते म्हणाले, ‘ व्हॉट्सअॅपकडून नवीन अपडेट तसेच ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेड कऱण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे डेटा हॅकर्सपासून तुमचा मोबाईल सुरक्षित राहील.  

असे करा व्हाॅट्सअॅप अपडेट

जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर गूगल प्ले स्टोर वर जा. तेथे Whatsapp सर्च करा, आपले व्हाॅट्सअॅप समोर येईल. खाली UPDATE असे लिहिलेलं दिसेलं अपडेटच बटण प्रेस करा, आपले व्हाॅट्सअॅप अशा प्रकारे अपडेट होईल.  व्हाॅट्सअॅप अपडेट करतेाना मोबाईलचे इंटरनेट चालू असणं गरजेच आहे.

व्हाॅट्सअॅप अपडेट करण्यासाठी आपण दुसरी पद्धत वापरू शकता. ते असे, जेव्हा आपण प्ले स्टोर ओपन कराल स्क्रिनवर तीन लाईन्स दिसतील, या तीन लाईन्सवर क्लिक केल्यास स्क्रीनच्या वरच्या भागात My Apps & Games हे ऑप्शन लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला फोनमध्ये इन्स्टॉल असलेल्या सर्व अॅप्सची यादी दिसेल. या यादीत व्हाॅट्सअॅप समोरील  UPDATE बटण दाबून तुम्ही व्हाॅट्सअॅप अपडेट करू शकता. तसेच अॅपल यूजर्स अॅपल स्टोर मध्ये WhatsApp सर्च करून  व्हाॅट्सअॅप अपडेट करू शकता.    

उपलब्ध माहितीनुसार, या स्पायवेअरची निर्मिती ईस्राइलच्या सायबर इंटेलिजंस कंपनी एनएसओ ग्रूपने केली आहे.व्हॉट्सअॅपमधील या त्रुटीमुळेच हॅकर्स व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉलच्या माध्यमातून कॉल करून मोबाईलमध्ये स्पायवेअर टाकू शकतात. यावेळी आपण कॉल रिसीव्ह केला असेल अथवा नसेल तरीही हे स्पायवेअर आपल्या फोनमध्ये अपलोड होते. दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू असून तपासणीत मदत व्हावी यासाठी अमेरिकेच्या संस्थांनाही माहिती देण्यात आली आहे.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी