WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी नवनवीन फीचर्स आणत आहे. हे नवीन प्रयोग युजर्सला सर्व प्रकारची सहजता आणतात. दरम्यान कंपनी एक एक भन्नाट प्रयोगावर काम करत आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर वापरकर्ते युजर्स त्यांचे लिखित शब्द न हटवता दुरुस्त करू शकतील. बरेच जण व्हाट्सचा उपयोग इटपट मेसेजिंगसाठी करत असतात. परंतु याच घाईत अनेकांकडून चुकीचा मेसेज पाठवला जातो आणि अर्थाचा अनर्थ होत असतात. या समस्येवर व्हाट्सअप उपाय शोधत आहे.
Whatsapp कंपनी आपल्या अॅपच्या बीटा आवृत्तीवरील एडिट बटणाची चाचणी करत आहे. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये एडिट करण्याचा पर्याय नाही. सध्या व्हॉट्सअॅपची अवस्था ट्विटरसारखीच आहे, जिथे पाठवलेले मेसेज डिलीट करता येतात पण एडिट करता येत नाहीत.
Whatsapp ने नुकतेच रिअॅक्शन फीचर लाँच केले आहे. जे यूजर्सना खूप आवडले आहे. यानंतर आता WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp टेक्स्ट मेसेज एडिट करण्यासाठी एक फीचर देणार आहे. पुढील अपडेटपर्यंत हा पर्याय Whatsapp वर उपलब्ध असेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. Whatsapp हे वैशिष्ट्य सर्व Android बीटा, iOS बीटा आणि डेस्कटॉपसाठी तयार करत आहे.