Share HD Image and HD Video easily from Whatsapp : व्हॉट्सअॅपवरून ओळखीतल्यांना, मित्रमैत्रीणींना, नातलगांना फोटो आणि व्हिडीओ शेअर करता येतात. पण व्हॉट्सअॅपवरून शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ यांच्या गुणवत्तेत अर्थात क्वालिटीमध्ये थोडा फरक पडतो. यावर एक सोपा प्रभावी उपाय आहे. जाणून घ्या व्हॉट्सअॅपवरून ओळखीतल्यांना एचडी क्वालिटी फोटो आणि एचडी क्वालिटी व्हिडीओ शेअर करण्याचा सोपा आणि प्रभावी उपाय....
ज्या व्यक्तीला अथवा ग्रुपला फोटो किंवा व्हिडीओ शेअर करायचा आहे त्या व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या चॅटबॉक्समध्ये जावे. तिथे अॅटॅचमेंट अर्थात पेपर पिन किंवा यू क्लिपवर क्लिक करा. यानंतर डॉक्युमेंट हा पर्याय निवडा आणि फोटो, व्हिडीओ पाठवा. या पद्धतीने कोणत्याही व्यक्ती अथवा ग्रुपला आपण व्हॉट्सअॅपद्वारे एचडी क्वालिटी फोटो आणि एचडी क्वालिटी व्हिडीओ शेअर करू शकता.
डॉक्युमेंट या पर्यायाद्वारे एचडी क्वालिटी फोटो आणि एचडी क्वालिटी व्हिडीओ शेअर करण्यासाठी आधी सेटिंगमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जाणून घ्या हा सेटिंगमधील बदल...
Heart Attack: हिवाळ्यात सर्वाधिक असतो हार्ट अॅटकचा धोका, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी