Taste the TV : टीव्हीतून घ्या पदार्थाची चव

Taste the TV : Japan invents lickable screen to imitate food flavours : जपानच्या मीजी विद्यापीठातील प्राध्यापिका होमी मियाशिता यांनी पदार्थाच्या चवीची अनुभुती देणारी टीव्ही स्क्रीन विकसित केली आहे. टेस्ट द टीव्ही (TTTV) असे या उपकरणाचे नाव आहे.

Taste the TV : Japan invents lickable screen to imitate food flavours
Taste the TV : टीव्हीतून घ्या पदार्थाची चव 
थोडं पण कामाचं
  • Taste the TV : टीव्हीतून घ्या पदार्थाची चव
  • जपानच्या टीमने विकसित केले तंत्रज्ञान
  • टेस्ट द टीव्ही उपकरणाच्या निर्मितीचा सध्याचा खर्च जवळपास एक लाख येन

Taste the TV : Japan invents lickable screen to imitate food flavours : नवी दिल्ली : जपानच्या मीजी विद्यापीठातील प्राध्यापिका होमी मियाशिता यांनी पदार्थाच्या चवीची अनुभुती देणारी टीव्ही स्क्रीन विकसित केली आहे. टेस्ट द टीव्ही (TTTV) असे या उपकरणाचे नाव आहे. या उपकरणाच्या स्क्रीनला जिभेने स्पर्श करताच पदार्थाची चव जाणवते.

होमी मियाशिता यांच्या नेतृत्वात ३० जणांच्या टीमने टेस्ट द टीव्ही (TTTV) विकसित केले आहे. एका टेस्ट द टीव्ही (TTTV) उपकरणाच्या निर्मितीचा सध्याचा खर्च जवळपास एक लाख येन एवढा आहे. 

टीव्ही स्क्रीनवर टेस्ट द टीव्ही (TTTV) हे उपकरण लावता येते. यानंतर टीव्हीला उद्देशून विशिष्ट चवीचे पदार्थ सादर करण्यास सांगता येते. टीव्हीवर संबंधित पदार्थ दिसत असताना जिभेने टीव्ही स्क्रीनवर लावलेल्या टेस्ट द टीव्ही या उपकरणाला स्पर्श करताच पदार्थाच्या चवीची अनुभुती घेता येते. या पद्धतीने पदार्थाची चव आणि गंध घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

टेस्ट द टीव्ही (TTTV) हे उपकरण व्यावसायिक स्वरुपात यशस्वी झाले तर एका देशातील व्यक्ती दुसऱ्या देशातील व्यक्तीकडून टीव्हीच्या माध्यमातून पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊ शकेल. तसेच परदेशात तयार झालेल्या पदार्थाची चव चाखून त्याबाबतचे मत देऊ शकेल. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फूड अँड टेस्टिंग गेम्स पण विकसित करता येतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी