2020 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले 'हे' 5 सेलिब्रिटी 

5 most searched ent personalities of 2020: २०२० मधील सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या लोकांच्या नावाची यादी गुगलने जाहीर केली आहे. यात चित्रपट कलाकारांमध्ये बेबी डॉल डॉल फेम गायिका कनिका कपूर पहिल्या स्थानावर आहे.

 5_most_searched_ent_personalities_of_2020
2020 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले 'हे' 5 सेलिब्रिटी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • गुगलने वर्ष 2020 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या लोकांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
  • यामध्ये चित्रपट कलाकारांमध्ये गायिका कनिका कपूर अव्वल आहे.
  • या यादीमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे यांचा देखील समावेश आहे.

मुंबई: 5 most searched ent personalities of 2020:  गुगलने सन २०२० मध्ये सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. Google दरवर्षाच्या अखेरीस त्या वर्षभरात सर्च केलेल्या लोकांच्या नावाची  यादी जाहीर करतं. यावर्षी बेबी डॉल डॉल फेम गायिका कनिका कपूर हीचं नाव फिल्म स्टारच्या यादीत सर्वात वर आहे. कनिका कपूर ही यावर्षी मार्चमध्ये बरीच चर्चेत आली होती. जेव्हा तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बरेच दिवस ती मीडिया आणि सोशल मीडियामध्ये चर्चेत होती. तिच्याविषयी नंतर मिम्स देखील बनविण्यात आले होते.

Google च्या मोस्‍ट सर्च पर्सनेलिटीज यादीमध्ये 5  बॉलिवूड सेलिब्रिटींना स्थान मिळाले आहे. टॉप 10 च्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कनिका कपूर, (Kanika Kapoor) पाचव्या क्रमांकावर अमिताभ बच्चन, (Amitabh Bachchan) सातव्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती (rhea chakraborty), नवव्या क्रमांकावर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि दहाव्या क्रमांकावर कंगना रनौत (Kangana Ranaut) यांचा समावेश आहे. या यादीच्या शीर्षस्थानी (Top) अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) हे आहेत.

दरम्यान, १४ जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही अचानक चर्चेत आली होती. सुशांतच्या आत्महत्येसाठी रियाला जबाबदार मानले जात होते आणि त्याच्यावर कारवाई केली जावी अशी अनेकांची मागणी होती. यावेळी सुशांत सिंग राजपूतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडेही चर्चेत आली होती. सुशांत प्रकरणात कंगना राणौतदेखील नेपोटिझ्मविरोधात आवाज उठविल्याने प्रचंड आली चर्चेत होती.

गुगलने एकूण सर्चची देखील यादीही जाहीर केली आहे.  ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा सातव्या सिनेमा दिल बेचारा हा सातव्या स्थानी आहे. जगभरात हा सिनेमा अनेकांनी सर्च केल्यामुळे संपूर्ण सर्च यादीत याला सातवं स्थान मिळालं आहे. तसेच चित्रपटांच्या यादीत दिल बेचरा याला प्रथम स्थान मिळालं आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि ओटीटीवर त्याने नवनवे विक्रम नोंदविले. या चित्रपटात संजना संघी ही देखील मुख्य भूमिकेत होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी