Tik Tok ने रिलीज केलं नवं फीचर, 'या' फीचरची माहिती घेणं 'मस्ट' आहे!

आपली मुलं टिक टॉकवर किती वेळ घालवतात आणि नेमकं काय करतात हे पालकांना समजणार आहे. त्यासाठी टिक टॉकच एक नवं फीचर घेऊन येणार आहे. 

tik tok launches feature for parents children will be able to control
Tik Tok ने रिलीज केलं नवं फीचर, 'या' फीचरची माहिती घेणं 'मस्ट' आहे!  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: देशात हळूहळू Tik Tok यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे टिक टॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. टिक टॉकचा वापर सर्वाधिक तरुण आणि अल्पवयीन मुलं करत असल्याचं समोर आलं आहे. टिक टॉक व्हिडिओसाठी अनेक विचित्र स्टंट केले जातात. तसंच अनेकांना अक्षरश: टिक टॉकचं व्यसन लागलं आहे.  पण आता हेच व्यसन सोडविण्यासाठी टिक टॉकने  एक नवं फीचर आणलं आहे. 

या नव्या फीचरमुळे आई-वडील हे आपल्या मुलांचा टिक टॉक कंट्रोल करु शकतात. हे नवं फीचर यावर कंट्रोल ठेवेल की, मुलं या अॅपवर किती वेळ घालवतात. या नवीन फीचरचं नाव फॅमेली सेफ्टी मोड असं आहे. तथापि, हे फीचर सध्या ब्रिटनमध्येच  उपलब्ध आहे. पण लवकरच येत्या काही दिवसात ते इतर देशांमध्येही रोल आऊट केलं जाईल.

फॅमेली सेफ्टी मोड याच्या माध्यमातून पालक आपल्या टिक टॉक अकाउंटवरुन आपल्या मुलांचं टिक टॉक अकाउंट कनेक्ट करु शकतात. ज्याद्वारे पालकांना मुलांच्या अकाउंटवरील स्क्रीन टाइम मॅनेजमेंट, डायरेक्ट मेसेज कंट्रोल आणि रिस्ट्रिक्टेड मोड यासारख्या डिजिटल फीचरचा वापर करु शकतील.

दररोज  मुलांनी अॅपवर किती वेळ घालवावा हे स्क्रीन टाइम मॅनेजमेंटच्या माध्यमातून पालक नियंत्रित करू शकतात. डायरेक्ट मेसेजमध्ये पालक हे देखील नियंत्रित करु शकतात की, त्यांच्या मुलांच्या कनेक्टेड अकाउंट्समध्ये कोण मेसेज पाठवू शकतं. किंवा ते डायरेक्ट मेसेज पूर्णपणे टर्न ऑफ देखील करु शकतात. तसंच रिस्ट्रिक्टेड मोडमध्ये असा कंटेंट कमी करु शकतात. जो सर्व दर्शकांसाठी उपयुक्त नाही.

या नव्या फीचरची घोषणा करताना टिक टॉकने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, यूजर्सची प्रायव्हसी ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आम्हाला असं वाटत की, लोकांनी टिक टॉकवर मजा करावी. परंतु त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची देखील काळजी घेतली पाहिजे. याचा अर्थ असा की, ऑनलाइन अॅप्स आणि सुविधा यांचं हेल्दी रिलेशनशिप ठेवणं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी