TikTok: टॉपवर पोहोचलं टिकटॉक अॅप, या कामासाठी यूजर्सना दरदिवशी मिळतायेत १ लाख रुपये

सोशल सॅव्ही
Updated May 09, 2019 | 19:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Tiktok App: टिकटॉक अॅप पुन्हा एकदा अॅपल स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवर टॉपवर पोहोचलं आहे. कंपनी एक कॅम्पेन चालवत आहे. त्याअंतर्गत दररोज यूजर्सला १ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जात आहे... जाणून घ्या या कॅम्पेनबद्दल...

TikTok App
टिकटॉक पाहा कुणाला देतंय १ लाखांचं बक्षीस  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: बॅन हटवल्यानंतर टिकटॉक पुन्हा एकदा अॅपल अॅप स्टोरमध्ये फ्री अॅप कॅटेगिरी आणि गुगल प्ले स्टोरवर सोशल कॅटेगिरीमध्ये टॉप फ्री स्पॉटवर पोहोचलं आहे. बुधवारी कंपनीनं याबद्दल माहिती दिली की अॅप एकदा पुन्हा टॉप पोझिशनवर पोहोचलं आहे. दोन्ही अॅप स्टोरमध्ये टिकटॉकच्या टॉपवर पोहोचण्या मागे कंपनीच्या प्रमोशन विभागाचा मोठा हात आहे. टिकटॉक यूजर्सना कंपनी #ReturnofTiktok सोबत मायक्रोसॉईट सोशल मीडियावर शेअर करायला सांगत आहे आणि यासाठी कंपनीनं १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

या मायक्रोसाईटवर टिकटॉकची लिंक दिली गेली आहे, ज्याच्या मदतीनं अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवरून हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. टिकटॉक (इंडिया)च्या एंटरटेनमेंट स्ट्रेटजी आणि पार्टनरशीप हेड प्रमुख सुमेधास राजगोपाल यांनी सांगितलं, ‘भारतात २० कोटी यूजर्सचा रिस्पॉन्स, सपोर्ट आणि प्रेमासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही टिकटॉक कुटुंबासोबत आपला प्रवास पुढेही सुरूच ठेवू आणि यूजर्ससाठी सुरक्षित वातावरण बनवून ठेवण्यासाठी त्या दिशेनं आमचं काम सुरू केलं आहे.’ आपल्याला माहितीच आहे की, मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंचनं टिकटॉक अॅपवर गेल्या महिन्यात सुरूवातीच्या आपत्तीकारक आणि पॉर्नोग्राफिक कंटेटमुळं बॅन लावला होता. ज्यानंतर गुगल आणि अॅपलनं हे अॅप आपल्या स्टोरमधून हटवलं होतं.

मात्र मागील महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं अॅपवरील बंदी हटवली. कंपनीनं अॅप डाऊनलोडला चालना देण्यासाठी १ मे पासून नवं कॅम्पेनिंग सुरू केलं आहे. या अंतर्गत मायक्रोसाईटला सोशल मीडियावर प्रमोट करण्यासाठी कंपनीनं १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. टिकटॉकचं हे प्रमोशनल कॅम्पेन १६ मे पर्यंत सुरू राहणार आहे. टिकटॉक अॅपची मालकी असलेली चीनची कंपनी बाईटडांसनं दावा केला आहे की, भारतात त्यांच्या मासिक अॅक्टिव्ह यूजर्सची संख्या १२ कोटी रुपयांहून अधिक आहे.तेव्हा आता या प्रमोशनल कॅम्पेनचा टिकटॉकला चांगलाच फायदा होऊ शकतो. १६ मे नंतर १ लाखांचं बक्षीस कुणाकुणाला मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
TikTok: टॉपवर पोहोचलं टिकटॉक अॅप, या कामासाठी यूजर्सना दरदिवशी मिळतायेत १ लाख रुपये Description: Tiktok App: टिकटॉक अॅप पुन्हा एकदा अॅपल स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवर टॉपवर पोहोचलं आहे. कंपनी एक कॅम्पेन चालवत आहे. त्याअंतर्गत दररोज यूजर्सला १ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जात आहे... जाणून घ्या या कॅम्पेनबद्दल...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola