भारतातील कोविड-१९ संदर्भातील वैद्यकीय मदतीसाठी ट्विटरचे नवे 'अॅडव्हान्स सर्च'

सोशल सॅव्ही
Updated Apr 25, 2021 | 22:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

ट्विटरने भारतातील कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविड-१९ संदर्भात मदतीची आवश्यकता असल्यास 'अॅडव्हान्स सर्च' ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय मदतीचा शोधण्यासाठी. नवी सुविधा उपयुक्त

Twitter launches new Advance Search option
वैद्यकीय मदतीसाठी ट्विटरचे नवे 'अॅडव्हान्स सर्च  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • ट्विटरने सुरू केली नवी सुविधा
  • ट्विटरचे नवे 'अॅडव्हान्स सर्च
  • सुविधेचा वापर वैद्यकीय मदत शोधण्यासाठी

नवी दिल्ली : ट्विटरने भारतातील कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोविड-१९ संदर्भात मदतीची आवश्यकता असल्यास 'अॅडव्हान्स सर्च' ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नव्या 'अॅडव्हान्स सर्च' सुविधेचा लाभ घेत देशातील नागरिक वैद्यकीय मदतीचा शोध घेऊ शकतात.

ट्विटवर सर्च


कोविड-१९ साठी लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने सर्च करू शकतात. उदाहरणार्त, युजर्स वेगवेगळे फिल्टर लावू शकतात. स्पेसिफिक हॅशटॅग, विशिष्ट कालावधी, एखाद्या ट्विटर अकाउंट केलेले ट्विट्स इत्यादी पद्धतीने वैद्यकीय मदत शोधली जाऊ शकते.

कोरोनाची दुसरी लाट


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतो आहे. आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान या संकटामुळे निर्माण झाले आहे. अशात ऑक्सिजन, औषधे आणि हॉस्पिटलमधील बेड यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा शोध सुरू असतो. अशावेळी अनेक नागरिक फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेत असतात. आपल्या जवळ उपलब्ध असणारे हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन सिलिंडर इत्यादींची माहिती ते सोशल मीडियावरून घेत असतात. 

ट्विटरचे नवे 'अॅडव्हान्स सर्च' 


ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ट्विटरने आपली नवी सुविधा ट्विटर 'अॅडव्हान्स सर्च' सुरू केली आहे. यामुळे लोकांना ताजी आणि त्यांना आवश्यक असलेली माहिती आणि संसाधने शोधता येणार आहेत. ट्विटर इंडियाने यासंदर्भात ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. ट्विटरच्या 'अॅडव्हान्स सर्च'चा वापर करून नागरिक ट्विटरमधील माहिती फिल्टर करून आपल्याला आवश्यक ती माहिती शोधू शकतात. एखाद्या विशिष्ट ट्विटर खात्यावरून करण्यात आलेले ट्विटदेखील यामुळे शोधता येऊ शकते.  

असे वापरा नवे 'अॅडव्हान्स सर्च' 


याशिवाय आपल्या ठिकाणांपासून जवळ असलेले ट्विट्सदेखील युजर शोधू शकतात. ही सुविधा वापरण्यासाठी सर्च बार मध्ये संबंधित हॅशटॅग टाईप करा, उजव्या बाजूला वर असणाऱ्या टॉगल बटणावर टॅप करा आणि निअर यु पर्यायाला ऑन करा. तुमचे लोकेशन सेटिंग ऑन करायला विसरू नका.

ताजे ट्विट्स टाईमलाईननुसार दिसावेत यासाठी युजरना उजवीकडे वर असणाऱ्या त्यांच्या होम टाईमलाईनमधील स्पार्कल बटणावर टॅप करावे लागेल. यामुळे युजरच्या टाईमलाईनवर ताजे ट्विट दिसतील.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अभूतपूर्व गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध पावले उचलत आहेत.  रेमडेसिविर औषधांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सरकारने अलीकडेच रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. शिवाय सरकारने औषध निर्मिती कंपन्यांशीही चर्चा केली आहे. नजीकच्या काळात रेमडेसिविरची किंमतदेखील कमी होणार आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठीदेखील सरकारी यंत्रणा विविध उपाययोजना करते आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशभर मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येतो आहे. लस देण्यासाठीचे वय आता १८ वर्षे करण्यात आले आहे. त्यावरील वयोगटातील नागरिकांना लस घेता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी