Twitter ने पुन्हा सुरू केलं 'ब्लू टिक व्हेरिफिकेशन' जाणून घ्या कसे करावं अप्लाय

Twitter blue tick verification restart: ट्विटर युजर्सला ब्लू टिक देण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केली आहे. त्यामुळे आता युजर्स ब्लू टिक मिळावं यासाठी अप्लाय करु शकणार आहेत.

Twitter blue tick
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Know how to apply for Twitter blue tick: ट्वीटरने जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्लू टिक व्हेरिफिकेशनची (Blue Tick Verification) प्रोसेस सुरू केली आहे. यामुळे आता ट्विटरवर लवकरच नवीन व्हेरिफाइड अकाऊंट्स पहायला मिळणार आहेत. यासाठी ट्विटरने सेल्फ अॅप्लिकेशन पोर्टल (Self Application Portal) सुरू केलं आहे. म्हणजेच या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आपलं ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड करण्यासाठी तुम्ही अप्लाय करु शकणार आहात. नोव्हेंबर २०१७ मध्ये ट्विटरने ब्लू टिक व्हेरिफिकेशन प्रोसेस थांबवली होती जी आता पुन्हा एकदा सुरू केली आहे.

Twitter Account अॅक्टिव्ह असणं गरजेचं 

ट्विटरने सांगितले की, कुठलेही अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी ते अकाऊंट अॅक्टिव्ह असणे गरजेचं आहे. यासोबतच अकाऊंट ज्या युजर्सचं आहे तो एक चर्चित चेहरा असवा. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने यासाठी एकूण सहा कॅटेगरीज तयार केल्या आहेत.

कुणाला मिळू शकतं ब्लू टिक?

  1. सरकार (राज्य किंवा केंद्र) 
  2. कंपनी, ब्रँड्स आणि एनजीओ 
  3. न्यूज संस्था आणि पत्रकार
  4. एन्टरटेन्मेंट किंवा मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती 
  5. क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती
  6. अॅक्टिव्हिस्ट, ऑर्गनायझेशन आणि इतर प्रभावशाली व्यक्ती

Twitter ने सांगितले की, या व्यतिरिक्त इतरही काही अकाऊंट्सचा यामध्ये समावेश करण्याच्या सूचना आपल्याला मिळाल्या आहेत. यामधअये शिक्षण, वैज्ञानिक आणि धार्मिक गुरू इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत या श्रेणींचा समावेश होऊ शकतो. सध्या हे सर्व अॅक्टिव्हिस्ट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट आहेत.

'या' अकाऊंट्सचे व्हेरिफाईड स्टेटस समाप्त होणार

ट्विटरने म्हटले की, अनेक व्हेरिफाईड अकाऊंट्स जे आता यासाठी पात्र नाहीयेत त्यांचे व्हेरिफाईड स्टेटस काढून टाकण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, असे युजर जे यापूर्वी सरकारचा हिस्सा होते मात्र, आता सरकारसोबत संबंध नाहीये त्यांचे ब्लू टिक व्हेरिफिकेशन काढून टाकण्यात येऊ शकते. तसेच प्रसिद्ध व्यक्ती जे आता हयात नाहीयेत अशा व्यक्तींच्या अकाऊंट्सचेही ब्लू टिक व्हेरिफिकेशन काढण्यात येईल. 

कसे कराल अप्लाय?

  1. ट्विटरने यासाठी एक पोर्टल तयार केले आहे जेथे युजर्सला काही कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती सबमिट करावी लागणार आहे. जर आपणही ट्विटरने वर नमुद केलेल्या ६ श्रेणींपैकी एका प्रकारात असाल तर आपण ब्लू टिकसाठी अर्ज करु शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 
  2. आपल्या खात्यावर लॉग ईन करा. यानंतर आपल्या खात्याच्या सेटिंग्जवर जा आणि तेथे रिक्वेस्ट व्हेरिफिकेटशनसाठी अर्ज करावा लागेल.
  3. व्हेरिफिकेशनसाठी आपण अर्ज करताच किंवा टॅप करताच तुम्ही एका नवीन पेजवर जाल जेथे आपण आपली माहिती सबमिट करु शकता.
  4. आपण सबमिट केलेल्या माहितीवर ट्विटर समाधानी असल्यास तुम्हाला ब्लू टिक व्हेरिफिकेशन मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी