ट्विटरला सरकारने दिली शेवटची नोटीस; डिजिटल नियमांचे पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा !

सोशल मीडियासंबंधित नियमांचे (new rules for social media companies) पालन करावे अन्यथा त्याच्या परिणामांना सामोरे जावे असे सरकारने ट्विटरला बजावले आहे.

Government issues one last notice to Twitter
ट्विटर आणि सरकार यांच्यातील वाद शिगेला 

थोडं पण कामाचं

  • ट्विटर आणि सरकार यांच्यातील वाद शिगेला
  • मोहन भागवतांच्या अकाउंटवरील ब्ल्यू टिक काढले
  • उपराष्ट्रपतींच्या अकाउंटवरील ब्ल्यू टिक हटवले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्विटरला (Twitter) शेवटची संधी दिली आहे. सरकारने ट्विटरला शेवटची नोटीस (one last notice given to Twitter by Central Government) पाठवली आहे. भारतात आपल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि देशातील नव्या डिजिटल (Digital rules) आणि सोशल मीडियासंबंधित नियमांचे (new rules for social media companies) पालन करावे अन्यथा त्याच्या परिणामांना सामोरे जावे असे सरकारने ट्विटरला बजावले आहे. ट्विटर आणि सरकार यांच्यातील वाद शिगेला पोचला आहे. ट्विटर इन्कॉर्पोरेनशनला कळवण्यात येते की देशातील नियमांचे पालन करावे यासंदर्भातील ही शेवटची नोटीस आहे. नियमांचे पालन न केल्यास आयटी कायदा, २००० च्या कलम ७९ अंतर्गत (section 79 of the IT Act, 2000) कारवाई करण्यात येईल, आयटी कायदा आणि भारताच्या संबंधित यंत्रणांनी केलेल्या कारवाईला ट्विटरला सामोरे जावे लागेल, असे सरकारने आपल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. (Twitter : Government issues one last notice to Twitter, warns to follow new rules)

मोहन भागवतांच्या अकाउंटवरील ब्ल्यू टिक काढले


ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवतांच्या (RSS chief, Mohan Bhagwat) अकाउंटवरून ब्ल्यू टिक (Blue Tick) काढून टाकले आहे. ट्विटर मागील सहा महिन्यांपासून आपल्या इनअॅक्टिव्ह अकाउंटला (Inactive account) व्हेरिफाय करते आहे. या प्रक्रियेत देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासहीत अनेक नेत्यांच्या अकाउंटवरून ब्ल्यू टिक ट्विटरने काढून टाकले आहे. हे करण्यामागे आपल्या कंपनीची पॉलिसी असल्याचे ट्विटरने सांगितले आहे. आमच्या व्हेरिफिकेशन पॉलिसीनुसार, जर एखादे अकाउंट इनअॅक्टिव्ह झाले असेल तर ब्ल्यू टिक काढण्यात येते, असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. अर्थात काही तासांनंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाउंटवर ब्ल्यू टिक परत लागू करण्यात आले आहे. मात्र इतर अनेक नेत्यांचे अकाउंट अद्यापही अनव्हेरिफाईड स्थितीतच आहे. ट्विटरच्या या कारवाईसंदर्भात सोशल मीडियावर मोठा गदारोळ होतो आहे.

ट्विटरची इनअॅक्टिव्ह अकाउंट पॉलिसी


अकाउंट रजिस्टर झाल्यानंतर लोकांना सक्रियरित्या लॉग इन करायचे असते. आपल्या अकाउंटला अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी युजरला सहा महिन्यातून किमान एकदा तरी लॉगिन करावे लागते. दीर्घ कालावधीसाठी जर लॉगिन केले नाही तर अकाउंट रद्द केले जाऊ शकते. लॉगिनच्या आधारावर ट्विटर युजरच्या अॅक्टिव्हिटीला ट्रॅक करत असते. उपराष्ट्रपतींनी २३ जुलै २०२० ला शेवटचे ट्विट केले होते. 

उपराष्ट्रपतींच्या अकाउंटवरील ब्ल्यू टिक हटवले


भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu)यांच्या ट्विटर खात्यावरील ब्ल्यू टिक कंपनीने काढून टाकले आहे. त्यांच्या खासगी खात्यावरील ब्ल्यू टिक काढून टाकण्यात आलेले असले तरी अधिकृत खात्यावरील ब्ल्यू टिक मात्र तसेच आहे. ट्विटर सध्या अकाउंटचे व्हेरिफिकेशन करते आहे, त्यामुळेच इनअॅक्टिव्ह खात्यांवरील ब्ल्यू टिक काढून टाकण्यात येत असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात येते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी