भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक

Twitter Rolls Out Paid Verification Service In India, cost rupees 719 per Month : भारतात दरमहा 8.9 डॉलर म्हणजे 719 रुपये मोजून ट्विटरची ब्ल्यू टिक मिळेल.

Twitter Rolls Out Paid Verification Service In India, cost rupees 719 per Month
भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक
  • प्रत्येक देशासाठी ब्ल्यू टिकसाठीचे मासिक दर वेगवेगळे
  • अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके या देशांमध्ये दरमहा 8 डॉलर तर भारतात दरमहा 8.9 डॉलर मोजल्यास ब्ल्यू टिक मिळेल

Twitter Rolls Out Paid Verification Service In India, cost rupees 719 per Month : भारतात दरमहा 8.9 डॉलर म्हणजे 719 रुपये मोजून ट्विटरची ब्ल्यू टिक मिळेल. अॅलन मस्क यांनी ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेतल्यानंतर जगभर ब्ल्यू टिक ही सेवा सशुल्क (पेड सर्व्हिस) करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रत्येक देशातील ब्ल्यू टिकसाठीचे मासिक दर जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. भारतात ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी दरमहा 8.9 डॉलर म्हणजे 719 रुपये मोजावे लागतील. 

ट्विटरने प्रत्येक देशासाठी ब्ल्यू टिकसाठीचे मासिक दर वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर निश्चित करताना संबंधित देशातील सोशल मीडिया युझरच्या सरासरी आर्थिक क्षमतेचा (purchasing power parity / क्रयशक्ती समता) विचार करत असल्याचे ट्विटरच्या व्यवस्थापनाने जाहीर केले. ही घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी ट्विटरने भारतातील ब्ल्यू टिकसाठीचा मासिक दर जाहीर केला आहे. 

Instagram तुम्हाला कोणी केलं अनफॉलो?, असं करा झटपट चेक

Whatsapp प्रोफाईल फोटोमध्ये दिसेल नवा अवतार, व्हॉट्सअॅपचे नवे अपडेट

ट्विटरच्या ब्ल्यू टिक युझरना रिप्लाय, मेंशन, सर्च या तीन प्रकारांमध्ये प्राधान्य मिळेल. तसेच ट्विटरचे ब्ल्यू टिक युझर मोठ्या कालावधीचा व्हिडीओ ट्वीट करू शकतील. ब्ल्यू टिक युझरना जाहिराती स्किप करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. इतर युझरच्या तुलनेत कमी जाहिराती ब्ल्यू टिक युझरना दिसतील. निवडक पेड आर्टिकल बायपास करण्याचा पर्याय ब्ल्यू टिक युझरना मिळेल. या उलट ब्ल्यू टिक नसलेल्या सामान्य ट्विटर युझरना कंपनीकडून दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती, पेड आर्टिकल यापैकी काहीही स्किप वा बायपास करता येणार नाही.  

भारतात ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सेवा महिन्याभरात सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके या देशांमध्ये दरमहा 8 डॉलर तर भारतात दरमहा 8.9 डॉलर मोजल्यास ब्ल्यू टिक मिळेल. 

ट्विटरवरील सर्व इनअॅक्टिव्ह हँडल हटविण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तसेच ट्विटरवरील सर्व फेक हँडल टप्प्याटप्प्याने हटविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अॅलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर व्यवस्थापनात तसेच कारभारात बदल सुरू केले आहेत. या बदलांमधील एक महत्त्वाचा भाग म्हणून ट्विटरच्या पेड ब्ल्यू टिक सर्व्हिसकडे बघितले जात आहे.

ट्विटरच्या सुधारित धोरणानुसार ज्यांच्याकडे सध्या ब्ल्यू टिक आहे आणि ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, अशा सर्वांसाठी ब्ल्यू टिक ही पेड सर्व्हिस सुरू होणार आहे. या सशुल्क सेवेत दरमहा 8.9 डॉलर मोजून ब्ल्यू टिक मिळविता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी