Twitter Safety Breach : ट्विटर (Twitter) युजर्ससची टिव-टिव कमी आणि धकधक वाढवणारी बातमी हाती आली आहे. तुम्ही बेधडकपणे ट्विटरचा वापर करत असाल तर सावधान कारण 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला (Data Leak)गेलाय. सिक्योरिटी रिसर्चर रिपोर्टच्या दाव्यानुसार, 200 दशलक्षहून अधिक ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेले आहेत. हॅकरने(hacker)युजर्सचे ई-मेल आयडी (E-mail ID) चोरून ते एका ऑनलाइन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. (Twitter Security Breach: Data of 200 million Twitter users stolen)
अधिक वाचा : राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा फोटो
इस्त्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक एलोन गॅल यांनी लिंक्डइन पोस्ट करत म्हटले आहे की, 'फार मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेली आहे. दुर्दैवाने या घटनेमुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग आणि डॉक्सिंग या घटनांमध्ये वाढ होईल.
अधिक वाचा : योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट
गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्याबद्दल पोस्ट करत माहिती दिली होती. 'मोठ्या प्रमाणात ट्विटर युजर्सची माहिती चोरीला जात असल्याचं गॅल यांनी त्यावेळी म्हटलं होतं. दरम्यान, ट्विटरने या समस्येची चौकशी किंवा समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली आहे, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
ट्विटरच्या सुरक्षेबाबत एका रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. एका सुरक्षा फर्मच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सनी 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर युजर्सचे ईमेल आयडी चोरले आणि ते ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले आहेत. मात्र, ट्विटरवरून या डेटा चोरीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. काहींच्या मते, हा डेटा 2021 च्या सुरुवातीच्या काळात चोरीला गेल्याचंही म्हटलं जात आहे. यावेळी एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतली नव्हती.
दरम्यान याआधीही ट्विटरवरील डेटा चोरीला गेला होता. जानेवारी 2022 मध्ये सुमारे 54 लाख युजर्सचा डेटा चोरी झाल्याचे ट्विटर कंपनीने सांगितले होते.
अधिक वाचा : माझ्या जिवाला धोका, भरसभेत सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
या प्रकरणात, हॅव आय बीन पॉन्ड या ब्रीच-नोटिफिकेशन साइटचे निर्माते ट्रॉय हंट यांनीही या रिपोर्टच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केला आहे. ट्रॉय हंट यांनी म्हटलं आहे की, या रिपोर्टमधील दावा खरा आहे. त्यांनी लीक झालेला डेटा पाहिला आणि सांगितले की 'रिपोर्टमध्ये जे सांगण्यात आले ते खरं आहे. हॅकर्सने ऑनलाइन फोरमवर युजर्सच्या आयडीचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दरम्यान, या स्क्रीन शॉट्समध्ये त्याची ओळख किंवा ठिकाण याचा उल्लेख नाही.