twitter will not be free for every one elon musk says governments and commercial user will pay : ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक एलॉन मस्क यांनी एक घोषणा केली आहे. ट्विटर बदलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
सध्या ट्विटर सर्व युझरसाठी एक फ्री सर्व्हिस अर्थात विनामूल्य सेवा आहे. कोणीही पैसे न खर्च करता ट्विट करू शकते. रीट्वीट किंवा लाइक करू शकते. एखाद्या ट्वीटला प्रतिक्रिया देऊ शकते. तसेच व्यक्त न होता ट्विट बघू पण शकते. मात्र भविष्यात असे राहणार नाही.
सामान्यांना ट्विटर सध्या आहे तसेच विनामूल्य वापरता येईल. पण सेलिब्रेटी, राजकारणी, राजकीय पक्ष, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, मंत्री, मंत्रिमंडळाची विविध खाती आणि इतर सरकारी यंत्रणा अशा समाजावर प्रभाव टाकणाऱ्यांना त्यांच्या ट्विटर हँडलसाठी कंपनीला पैसे द्यावे लागतील. या बदल्यात कंपनी त्यांची ट्विट जास्तीत जास्त लोकांपर्यंत लगेच पोहोचतील अशी व्यवस्था करणार आहे.
ट्विटरच्या सशुल्क सेवेविषयी अद्याप सविस्तर माहिती जाहीर झालेली नाही. पण ट्विटर निवडक व्यक्तींसाठी सशुल्क असेल हे निश्चित झाले आहे. लवकरच या संदर्भात ट्विटरकडून औपचारिक घोषणा होईल आणि सशुल्क सेवेची सविस्तर माहिती जाहीर होईल.
तोट्यात असलेल्या ट्विटरला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याने ४४ अब्ज डॉलर मोजून खरेदी केले. एलॉन मस्कने हा व्यवहार केला त्याचवेळी ट्विटरमध्ये मोठे बदल होणार अशी चर्चा सुरू झाली. लवकरच प्रभावी व्यक्तींसाठी सशुल्क सेवा प्रत्यक्षात येईल आणि ट्विटरमधील मोठ्या बदलाची ही नांदी ठरेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर तोट्यातील ट्विटर कंपनी फायद्यात येईल असा विश्वास कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क यांना वाटत आहे.