नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक नवीन फिशिंग स्कॅम सुरू आहे. हा स्कॅम विशेषतः यूकेसाठी आहे. म्हणजेच ते युनायटेड किंगडममध्ये वापरकर्त्यांना मोफत व्हिसा आणि नोकरीचे फायदे देण्याचे सांगण्यात येत आहे. यूकेमध्ये काम करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना मोफत व्हिसा आणि इतर फायदे देण्यात येत आहे. या नवीन व्हॉट्सअॅप स्कॅम यूके सरकारच्या संदेशाशी जोडलेला असल्याने या मेसेजमुळे लोकांची फसवणूक होत आहे.
या संदेशात दिलेल्या लिंकवर कोणत्याही वापरकर्त्यांनी क्लिक केल्यास त्यांना बनावट डोमेनवर रीडायरेक्ट केले जाते. ही वेबसाइट यूके व्हिसा आणि इमिग्रेशन असल्याचं भासवत आहे. याव्यतिरिक्त, युनायटेड किंगडममध्ये उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास देखील सांगितले जात आहे. एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की व्हॉट्सअॅप यूजर्सना त्यांच्या फोनमध्ये एक मेसेज येत आहे ज्यामध्ये फ्री व्हिसा आणि जॉब बेनिफिट्सची माहिती देण्यात आली आहे. हे विशेषतः ज्यांना कामासाठी यूकेला जायचे आहे, त्यांना हे मेसेज येत आहेत.
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना यूकेमधील नोकर भरती माहिती देणारा संदेश पाठवला जात आहे. युनायटेड किंडमला 2022 मध्ये 1,32,000 पेक्षा जास्त अतिरिक्त कामगारांची गरज आहे आणि म्हणून सरकार भरती मोहीम राबवत आहे. या मोहिमेत 1,86,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या संदेशात दिलेल्या लिंकवर कोणत्याही वापरकर्त्यांनी क्लिक केल्यास त्यांना बनावट डोमेनवर रीडायरेक्ट केले जाते.