Update Google Chrome गूगल क्रोम अपटेड करा, हॅकिंगचे संकट टाळा

Update Google Chrome Browser, Avoid Hackers Attack आपले गूगल क्रोम ब्राउझर अपटेड करा आणि हॅकिंगचे संकट टाळा असा इशारा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) देशातील इंटरनेट युझरना गूगल क्रोम वापरत असल्यास आधी ब्राउझर अपडेट करा, असे सांगितले आहे.

Update Google Chrome Browser, Avoid Hackers Attack
गूगल क्रोम अपटेड करा, हॅकिंगचे संकट टाळा 
थोडं पण कामाचं
  • गूगल क्रोम अपटेड करा, हॅकिंगचे संकट टाळा
  • गूगल क्रोम ब्राउझर कसे अपटेड करावे?
  • गूगल क्रोम अप टू डेट असेल तर About Google Chrome वर क्लिक करताच Chrome is up to date असे दिसेल

Update Google Chrome Browser, Avoid Hackers Attack नवी दिल्ली: आपले गूगल क्रोम ब्राउझर अपटेड करा आणि हॅकिंगचे संकट टाळा असा इशारा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला आहे. भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) देशातील इंटरनेट युझरना गूगल क्रोम वापरत असल्यास आधी ब्राउझर अपडेट करा, असे सांगितले आहे. ब्राउझर अप टू डेट ठेवणे हे हॅकिंगचे संकट टाळण्याचा पहिला सोपा उपाय असल्याचे भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितले. 

अनेक युझर इंटरनेट वापराचा वेग वाढावा म्हणून त्यांचे पासवर्ड गूगल क्रोम या ब्राउझरमध्ये सेव्ह करतात. यामुळे एखाद्या अकाउंटला अॅक्सेस करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होते. पण आपले ब्राउझर अपटेड नसेल तर हॅकरना हॅकिंगची संधी मिळू शकते. हॅकर अपटेड नसलेल्या ब्राउझरना शोधून त्यांच्या माध्यमातून तुमचे सर्व पासवर्ड मिळवू शकतात. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते; असा इशारा भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला.

ब्राउझर डेव्हलपर त्यांचे ब्राउझर हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने अपटेड करत असतात. यामुळे दररोज दिवसातून किमान एकदा आपले ब्राउझर अप टू डेट असल्याची खात्री प्रत्येकाने करुन घ्यायला हवी. 

कोणतेही ब्राउझर कायम १०० टक्के सुरक्षित असेलच असे नाही. हॅकर्स आणि डेव्हलपर यांच्यात उंदीर-मांजराचा संघर्ष सतत सुरू असतो. यामुळे सर्वसामान्य युझरसाठी त्याच्या कॉम्प्युटरमधील सर्व सॉफ्टवेअर लायसन्सधारीत आणि अप टू डेट ठेवणे हाच हॅकर्सपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. 

सॉफ्टवेअर या प्रकारात पीसीची ऑपरेटिंग सिस्टिम, पीसीतील वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाणारी विविध सॉफ्टवेअर, ब्राउझर आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर यांचा समावेश होतो. हे सर्व सॉफ्टवेअर लायसन्सधारीत आणि अप टू डेट असल्यास आपण बऱ्याचअंशी सुरक्षित राहू शकता. स्वतःचे पासवर्ड वेळोवेळी बदलणे, पासवर्ड स्वतः व्यतिरिक्त कोणालाही मिळणार नाही याची खबरदारी घेणे, पासवर्ड कोणीही ओळखू शकणार नाही याची खबरदारी घेणे याद्वारे आपण स्वतःच्या पीसीचे आणि त्यातील माहितीचे संरक्षण करू शकता. 

गूगल क्रोम ब्राउझर कसे अपटेड करावे?

गूगल क्रोम ब्राउझरमधील एका कोपऱ्यात वरच्या दिशेस उभ्या रचनेत तीन ठिपक्यांची रेष दिसेल. या ठिकाणी सिंगल राइट क्लिक करा आणि Help मधील About Google Chrome वर क्लिक करा. आता ब्राउझर काही अपडेट आल्या असतील तर आपोआप अपडेटची प्रक्रिया सुरू करेल. ही प्रक्रिया पूर्ण होताच रिलाँच नावाचे बटण अॅक्टिव्ह होईल. या बटणावर क्लिक करताच ब्राउझर रिलाँच होईल आणि त्याचवेळी अप टू डेट झाले असेल. जर आपले गूगल क्रोम अप टू डेट असेल तर About Google Chrome वर क्लिक करताच Chrome is up to date असे दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी