एका स्मार्टफोनवर वापरा दोन Whatsapp

Use two WhatsApps on one smartphone, How to use two WhatsApp accounts in one smartphone : एकाच स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप वापरणे शक्य आहे. हे कसे करायचे ते जाणून घ्या.

Use two WhatsApps on one smartphone, How to use two WhatsApp accounts in one smartphone
एका स्मार्टफोनवर वापरा दोन Whatsapp  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एका स्मार्टफोनवर वापरा दोन व्हॉट्सअॅप
  • ब्रँडेड स्मार्टफोनवर एकाचवेळी दोन व्हॉट्सअॅप वापरणे शक्य
  • असे करा सेटिंग

Use two WhatsApps on one smartphone, How to use two WhatsApp accounts in one smartphone : व्हॉट्सअॅप हे भारतात तसेच जगभरात मेसेजिंगसाठी वापरले जाणारे एक लोकप्रिय अॅप आहे. एका स्मार्टफोनवर सामान्यपणे एक मोबाईल नंबर वापरला जातो आणि त्या नंबरशी कनेक्ट असलेले एक व्हॉट्सअॅप असते. पण आता एकाच स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप वापरणे शक्य आहे. हे कसे करायचे ते जाणून घ्या.

Xiaomi, Vivo, Oppo, OnePlus, Realme, Samsung या ब्रँडच्या स्मार्टफोनवर एकाचवेळी दोन व्हॉट्सअॅप वापरणे शक्य आहे. 

  1. सॅमसंग फोनसाठी सेटिंग - अॅडव्हान्स फीचर - ड्युएल मेसेंजर
  2. वनप्लस फोनसाठी सेटिंग - यूटिसिटिझ - पॅरलल अॅप्स
  3. धमाकेदार प्लान: 1198 रुपयांत वर्षभराची वॅलिडिटी, प्रत्येक महिन्याला 3 GB डेटा आणि बरंच काही
  4. MIUI वर चालणाऱ्या झिओमा फोनसाठी सेटिंग - अॅप्स- ड्युएल अॅप्स
  5. रिअलमी फोनसाठी सेटिंग - सेटिंग - अॅप मॅनेजमेंट - अॅप क्लोनर
  6. व्हिवो फोनसाठी सेटिंग - अॅप्स अँड नोटिफिकेशन्स - अॅप क्लोन
  7. ओप्पो फोनसाठी सेटिंग - सेटिंग - अॅप क्लोनर

कोणत्याही स्मार्टफोनचे मॉडेल असले तरी त्यावर ड्युएल व्हॉट्सअॅप अर्थात एका स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप वापरणयासाठी संबंधित मोबाईल हँडसेटच्या सेटिंगमध्ये जा.

कंपनीनुसार सेटिंगमध्ये जाऊन ड्युएल अॅप, अॅप क्लोन, अॅप क्लोनर, अॅप ट्विन, पॅरलल अॅप अशा स्वरुपाचा पर्याय शोधा आणि तो 
अॅक्टिव्ह करा.

आता व्हॉट्सअॅप (Whatsapp) समोर एक टॉगल लाईन दिसेल. ती ऑन करा. नंतर होमस्क्रीनवर परत जा. आता होमस्क्रीनवर दुसऱ्या व्हॉट्सअॅपचा आयकॉन दिसेल. या आयकॉनवर एखादी छोटी खूण असेल. आता एका स्मार्टफोनवरून दोन स्वतंत्र व्हॉट्सअॅप वापरणे शक्य होणार आहे.

जर आपल्या स्मार्टफोनवर दोन व्हॉट्सअॅप उघडण्यासाठी आवश्यक पर्याय नसेल तर पॅरलल अॅप डाऊनलोड करून त्याच्या मदतीने दोन व्हॉट्सअॅप  कार्यरत करू शकता.

Nokia Cheap Smartphone : फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन, पाहा C2 2nd एडिशनचे फीचर्स

धमाकेदार प्लान: 1198 रुपयांत वर्षभराची वॅलिडिटी, प्रत्येक महिन्याला 3 GB डेटा आणि बरंच काही

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी