व्हॉट्सअॅपने दिले स्पष्टीकरण, यूजर्सना द्यावी लागेल नव्या अटी-नियमांना मान्यता

व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की नव्या नीतिगत बदलांमुळे मेसेजच्या गोपनीयतेवर परिणाम होणार नाही. मात्र यूजर्सना नव्या नियम आणि अटींना मान्यता द्यावी लागेल.

WhatsApp
व्हॉट्सअॅपने दिले स्पष्टीकरण, यूजर्सना द्यावी लागेल नव्या अटी-नियमांना मान्यता, गोपनीयता कायम राहणार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपने बदलल्या होत्या या गोष्टी
  • अनेक लोकांनी शोधले व्हॉट्सअॅपला सुरक्षित पर्याय
  • काय सांगतो व्हॉट्सअॅपचा ब्लॉग?

मुंबई: व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मंगळवारी असे सांगितले आहे की त्यांच्या ताज्या नीतिगत बदलांमुळे (policy changes) मेसेजच्या गोपनीयतेवर (messages privacy) परिणाम होणार नाही. यासोबत व्हॉट्सअॅपच्या मालक (owner) असलेल्या कंपनीनेही (company) यूजर्सच्या डेटाच्या सुरक्षिततेबाबतच्या (users data concern) चिंताही दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअॅपने एका ब्लॉगपोस्टमध्ये (blog post) लिहिले आहे की ते जाहिरातींच्या (advertisements) दृष्टीने यूजर्सची संपर्कयादी (contact list) किंवा समूहांचा डेटा (group data) फेसबुकसोबत (Facebook) शेअर करत नाहीत आणि व्हॉट्सअॅप आणि फेसबुक हे व्हॉट्सअॅपवरचे मेसेज वाचू शकत नाहीत किंवा फोनही ऐकू शकत नाहीत.

गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपने बदलल्या होत्या या गोष्टी

गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपने आपल्या सेवा आणि अटींमध्ये आणि गोपनीयता नीतीत एक बदल केला होता आणि सांगितले होते की ते यूजर्सचा कोणताही डेटा वापरू शकतात आणि कोणत्याही प्रकारे फेसबुकसोबत शेअर करू शकतात. व्हॉट्सअॅपने असेही म्हटले होते की त्यांच्या सेवेचा लाभ चालू ठेवण्यासाठी यूजर्सना ८ फेब्रुवारी २०२१पर्यंत त्यांच्या या नव्या नियम आणि अटींचा स्वीकार करावा लागेल.

अनेक लोकांनी शोधले व्हॉट्सअॅपला सुरक्षित पर्याय

यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे फेसबुकसोबत यूजर्सचा डेटा शेअर करण्याबाबत इंटरनेटवर चर्चा चालू झाली आणि अनेक लोकांनी टेलिग्राम आणि सिग्नल अशा पर्यायी प्लॅटफॉर्म्सवर शिफ्ट व्हायला सुरुवात केली. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की नीतीतील बदल हे कोणत्याही प्रकारे आपले मित्र किंवा कुटुंबियांशी असलेल्या आपल्या मेसेजच्या गोपनीयतेवर प्रभाव टाकणार नाहीत. याऐवजी या बदलांमध्ये व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक मेसेज पाठवण्याबाबतच्या बदलांचा समावेश आहे जे वैकल्पिक आहेत आणि याद्वारे यात अधिक पारदर्शकता येते की आपण कोणत्या प्रकारे डेटा एकत्र करतो आणि त्याचा वापर करतो.

काय सांगतो व्हॉट्सअॅपचा ब्लॉग?

व्हॉट्सअॅपच्या या ब्लॉगमध्ये सांगण्यात आले आहे की व्हॉट्सअॅप मेसेजिंगला आणखी वेगवान आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी अॅड्रेस बुकमधून केवळ फोन नंबर (यूजर्सच्या परवानगीनंतर) पोहोचते आणि फेसबुकसारख्या इतर अॅप्ससोबत हे क्रमांक शेअर केले जात नाहीत. सोबतच त्यांनी असेही सांगितले आहे की जाहिरातींसाठीही यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही.

इंटरनेटच्या सुरक्षिततेबद्दल केला गेला होता हा दावा

इंटरनेट सुरक्षा संशोधक असलेल्या राजशेखर राजाहरिया यांच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की किमान १,७०० खासगी व्हॉट्सअॅप ग्रुप्सची लिंक एका वेब सर्चच्या माध्यमातून गूगलवर दाखवल्या जात होत्या. व्हॉट्सअॅपच्या या वादानंतर महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि फोनपेचे सीईओ समीर निगम यांच्यासह अनेक दिग्गज व्यावसायिकांनी म्हटले आहे की ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निवड करतील.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी