WhatsApp: जाणून घ्या व्हॉट्स अॅपमधील महत्त्वाचा बदल, कसं असेल नवं फीचर

सोशल सॅव्ही
Updated Apr 20, 2019 | 17:45 IST | टाइम्स नाऊ हिंदी

इन्संट मॅसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप नवीन फीचर टेस्ट करत आहे. लवकरच व्हॉट्स अॅपमध्ये आपल्याला नवीन फीचर्स पाहायला मिळतील. जाणून घ्या काय होणार आहे बदल व्हॉट्स अॅपमध्ये...

whats app
व्हॉट्स अॅपचे नवीन फीचर 

मुंबई: व्हॉट्स अॅप अँड्रॉईडसाठी लवकरच नवीन इमोजी स्टाईल आणणार असल्याचं कळतंय. ही स्टाईल स्टेटस अपडेट सेक्शनसाठी असेल. रिपोर्टनुसार नवीन इमोजी स्टाईल व्हॉट्स अॅप बीटा व्हर्जन २.१९.११० चा भाग असेल. सध्या हे डेव्हलपमेंट डिफॉल्टच्या रुपात डिसेबल आहे आणि हे सर्व बिटा यूजर्ससाठी उपलब्ध नाहीय. व्हॉट्स अॅपचं हे नवीन इमोजी फीचर एनिमेटेड व्हॉट्स अॅप स्टिकर फीचरच्या एक दिवसानंतरच स्पॉट केलं गेलं.

हे फीचर अँड्रॉईड, आयफोन आणि वेबसाठी लवकरच उपलब्ध होईल. या आठवड्याच्या सुरूवातीला व्हॉट्स अॅप अँड्रॉईडसाठी स्क्रीनशॉट ब्लॉक करणारं फीचर सुद्धा स्पॉट केलं गेलं आहे. या फीचरच्या मदतीनं आपण स्क्रीनशॉटला ब्लॉक करू शकतो. म्हणजे आपण स्वत:ला स्क्रीनशॉट घेण्यापासून ब्लॉक करू शकतो पण दुसरा यूजर स्क्रीनशॉट घेऊ शकतो.

WABetaInfo ने नवीन इमोजी फीचरला स्पॉट केलं आहे. हे फीचर अँड्रॉईल यूजर्ससाठी व्हॉट्स अॅपच्या बीटा व्हर्जन २.१९.११० मध्ये उपलब्ध आहे. हे नवीन इमोजी स्टाईल जुन्या इमोजी स्टाईलला रिप्लेस करेल, असं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे हे नवीन इमोजी स्टाईल स्टेटस अपडेटसाठी आहे. याने चॅटिंगमध्ये काहीही बदल होणार नाही.

तसं हे फीचर व्हॉट्स अॅपच्या बीटा व्हर्जन २.१९.११० मध्ये उपलब्ध आहे, पण तरीही हे सर्व बीटा टेस्टरसाठी उपलब्ध नाहीय. व्हॉट्स अॅप या नवीन इमोजी स्टाईलला कधी रिलीज करेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय व्हॉट्स अॅप एनिमेटेड स्टिकर फीचरवर पण काम करणं सुरू आहे. हे फीचर लवकरच अँड्रॉईल, आयफोन आणि वेब या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. तसंच व्हॉट्स अॅप नवीन डूडल यूआय टेस्ट करत आहे, जे अँड्रॉईडच्या व्हॉट्स अॅप बीटा व्हर्जन २.१९.१०६ वर पाहायला मिळेल.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपनं नवं फीचर आणलं आहे. यात लँडलाईन नंबर व्हॉट्सअॅपला कनेक्ट करता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या फिचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना जास्त होणार आहे. या फिचरच्या मदतीनं व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून अगदी सहजपणे व्हॉट्सअॅप ऑपरेट करू शकतात. तसंच या फिचरचं वैशिष्ट्य म्हणजे यूजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करण्याची गरज नसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
WhatsApp: जाणून घ्या व्हॉट्स अॅपमधील महत्त्वाचा बदल, कसं असेल नवं फीचर Description: इन्संट मॅसेजिंग अॅप व्हॉट्स अॅप नवीन फीचर टेस्ट करत आहे. लवकरच व्हॉट्स अॅपमध्ये आपल्याला नवीन फीचर्स पाहायला मिळतील. जाणून घ्या काय होणार आहे बदल व्हॉट्स अॅपमध्ये...
Loading...
Loading...
Loading...