WhatsApp : व्हॉट्सऍपने भारतात बंद केली लाखो अकाऊंट्स, तुमचे व्हॉट्सऍप सुरू आहे का?

WhatsApp Accounts Banned मेटाची (meta) मालकी असलेल्या व्हॉट्सऍपने (Whatsapp) भारतातील १८ लाखहून अधिक व्हॉट्सऍप अकाऊंट्स बंद केली आहेत. एकट्या फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सऍपने १४ लाखहून अधिक अकाऊंट्स बंद केली आहेत. माहिती तंत्रज्ञान २०२१ कायद्याखाली (IT Act 2021) ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सऍपने केले आहे.

whatsapp
व्हॉट्सऍप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेटाची मालकी असलेल्या व्हॉट्सऍपने भारतातील १८ लाखहून अधिक व्हॉट्सऍप अकाऊंट्स बंद केली आहेत.
  • एकट्या फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सऍपने १४ लाखहून अधिक अकाऊंट्स बंद केली आहेत.
  • माहिती तंत्रज्ञान २०२१ कायद्याखाली (IT Act 2021) ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सऍपने केले आहे.

WhatsApp Accounts Banned : नवी दिल्ली : मेटाची (meta) मालकी असलेल्या व्हॉट्सऍपने (Whatsapp) भारतातील १८ लाखहून अधिक व्हॉट्सऍप अकाऊंट्स बंद केली आहेत. एकट्या फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सऍपने १४ लाखहून अधिक अकाऊंट्स बंद केली आहेत. माहिती तंत्रज्ञान २०२१ कायद्याखाली (IT Act 2021) ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सऍपने केले आहे. (whatsapp bans more than 18 lakh accounts in india in March annual report 2022)

अधिक वाचा : Koo App ने बदलला आपला लूक, आता घ्या ब्राउजिंगचा खास अनुभव
 

या कारणामुळे बंद केले अकाऊंट्स

व्हॉट्सऍप कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतातून व्हॉटॅपला ५९७ तक्रारी मिळाल्या होत्या. त्यापैकी ७४ अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली होती. व्हॉट्सऍप प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा : WhatsApp यूजर्संना पैसे कमविण्याची संधी, Google Pay, Paytm आणि PhonePe ला देणार टक्कर

मार्च महिन्यात व्हॉट्सऍपने यासंदर्भात आपला एक अहवाल जारी केला आहे. त्यात व्हॉट्सऍप युजरने केलेल्या तक्रारी, व्हॉट्सऍपने केलेल्या कारवाई, तसेच व्हॉट्सऍपने स्वतःहून केलेल्या कारवाईंची माहिती देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : Twitter असे फीचर आणत आहे की तुम्ही थक्क व्हाल ! मालक झाल्यानंतर इलॉन मस्कने केली ही सूचना


व्हॉट्सऍपच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे की भारतात १८ लाख ५ हाजार अकाऊंट्स बंद करण्यात आली आहे. कंपनीने  म्हटले आहे की युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने आर्टिफिशियल इंटिलेजेन्स, आधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ आणि इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक केली आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ५० लाखहून अधिक युजर असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना आपला मासिक अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे. 
 

अधिक वाचा : Best Prepaid Plan | स्वस्त प्लॅनच्या शोधात आहात? मग हा आहे लयभारी प्लॅन...फक्त 141 रुपयांचा, तेही वर्षभरासाठी आणि दणकून डेटासुद्धा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी