यूजर्सच्या नाराजीपुढे झुकले WhatsApp, गोपनीयता अपडेटची योजना ढकलली पुढे

सोशल सॅव्ही
Updated Jan 16, 2021 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून आपल्या अपडेट केलेल्या गोपनीयता नीतीवरून प्रचंड टीकेचा सामना करत आहे. यूजर्समध्ये व्हॉट्सअॅपबद्दल खूप नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने एक मोठा निर्णय घेतला आहे.

WhatsApp privacy policy update
यूजर्सच्या नाराजीपुढे झुकले व्हॉट्सअॅप, गोपनीयता अपडेटची योजना ढकलली पुढे  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • व्हॉट्सअॅप गोपनीयतेशी संबंधित नीतीतल्या बदलांवरून अडचणीत
  • भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या 40 कोटीपेक्षाही जास्त
  • व्हॉट्सअॅपने यापूर्वी म्हटले होते की व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत नव्या अटींना द्यावी लागेल संमती

नवी दिल्ली: मेसेजिंग अॅप (Messaging app) व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नुकतीच आपली गोपनीयता नीती अपडेट (privacy policy update) करण्याची घोषणा केली होती ज्यानंतर यूजर्समध्ये (users) खूप नाराजी (dissatisfaction) पाहायला मिळाली. इतकेच नाही, तर लोकांनी व्हॉट्सअॅपला रामराम (shifting from WhatsApp) ठोकायलाही सुरुवात केली. यानंतर व्हॉट्सअॅपने अनेक माध्यमांमधून आपल्या यूजर्सना सांगण्याचा प्रयत्न केला की व्हॉट्सअॅप आपली गोपनीयता सुरक्षित (privacy safety) ठेवतो. मात्र आता व्हॉट्सअॅपने घोषणा केली आहे की ते आपल्या गोपनीयता नीतीतील अपडेट स्थगित (policy update postponed) करत आहेत.

नियम आणि अटी स्वीकारण्यासाठी देणार वेळ

व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे की आता यूजर्सना या नीतीची समीक्षा करण्यासाठी आणि अटींना मान्यता देण्यासाठी अधिक वेळ दिला जाईल. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की प्रायव्हसी अपडेट स्थगित करण्याचा निर्णय लोकांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे पसरलेल्या चिंतेमुळे घेण्यात आला आहे.

काय आहे व्हॉट्सअॅपचे अधिकृत म्हणणे?

व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वक्तव्यात त्यांनी म्हटले आहे, ‘आम्ही ती तारीख आता परत घेत आहोत जेव्हा लोकांना समीक्षा करणे आणि अटी स्वीकारण्यास सांगण्यात आले होते. 8 फेब्रुवारी रोजी कोणाचेही खाते सस्पेंड किंवा डिलीट केले जाणार नाही. व्हॉट्सअॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता कशी काम करते याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही बरेच काही करत आहोत. 15 मे रोजी नव्या व्यापाराच्या संधी बाजारात उपलब्ध होण्याआधी आम्ही हळूहळू नीतीची समीक्षा करण्यासाठी लोकांकडे जाऊ.’

नव्या अपडेटबद्दल भ्रम पसरल्याचे कंपनीचे म्हणणे

व्हॉट्सअॅपने कंपनीच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की आम्ही इतक्या लोकांकडून ऐकले की आमच्या नव्या अपडेटबद्दल किती भ्रम आहेत. चिंता निर्माण करण्यासाठी खूप चुकीची माहिती देण्यात आली आहे. आम्ही प्रत्येकाला आमचे सिद्धांत आणि तथ्ये समजून घेण्यात मदत करू इच्छितो. व्हॉट्सअॅप एका साध्या विचाराने तयार करण्यात आले होते- आपण आपल्या मित्रांशी आणि कुटुंबियांशी जे काही शेअर करता ते आपल्या आपल्यातच राहाते. याचा अर्थ असा की आपल्यात झालेले खासगी बोलणे हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शनने सुरक्षित असते, जेणेकरून व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक ते पाहू शकणार नाही. याचमुळे आम्ही कोणाच्याही मेसेज किंवा कॉल्सचे लॉग्स ठेवत नाही. आम्ही आपली शेअर्ड लोकेशनही पाहू शकत नाही आणि आपली संपर्कयादी आम्ही फेसबुकशी शेअर करत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी