व्हॉट्सअॅप नरमले, प्रायव्हसी पॉलिसीचा आग्रह टाळला!

सोशल सॅव्ही
Updated Jul 10, 2021 | 13:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

व्हॉट्सअॅपने दिल्ली हायकोर्टासमोर असे म्हटले आहे की ज्या यूजर्सनी अद्याप त्यांच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही त्यांच्या व्हॉट्सअॅपच्या वापरावर कोणत्याही प्रकारची बंधने आणण्यात येणार नाहीत.

WhatsApp
व्हॉट्सअॅपचा पवित्रा वरमला, म्हटले, यूजर्सनी सध्यातरी नवी प्रायव्हसी पॉलिसी मान्य करणे गरजेचे नाही  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • यूजर्सची फंक्शनॅलिटी मर्यादित करणार नाही व्हॉट्सअॅप
  • संसदेने परवानगी दिल्यानंतरच लागू होणार पॉलिसी
  • एका न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला होता हा निर्णय

नवी दिल्ली -  WhatsApp Privacy Policy News: मेसेजिंग अॅप (Messaging app) असलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत (privacy policy) एक पाऊल मागे (back foot) घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटले आहे की नवे डेटा बिल (new data bill) लागू होईपर्यंत ते यूजर्नना (users) नवी प्रायव्हसी पॉलिसी (new privacy policy) स्वीकारण्यासाठी अनिवार्य (mandatory) करणार नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) आपल्या बचावासाठी (defense) बोलताना व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की ज्या यूजर्सनी अद्याप त्यांच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केला नाही त्यांच्या व्हॉट्सअॅपच्या वापरावर (WhatsApp usage) कोणत्याही प्रकारची बंधने (restrictions) आणण्यात येणार नाहीत.

यूजर्सची फंक्शनॅलिटी मर्यादित करणार नाही व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅपचे सर्व मालकी हक्क फेसबुक या कंपनीकडे आहेत. व्हॉट्सअॅपच्या या पवित्र्याने सर्वांनाच चकित केले आहे, कारण याच्याआधीचा त्यांचा पवित्रा याच्या उलट होता. मात्र आता तो नरम पडताना दिसत आहे. व्हॉट्सअॅपने मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाला सांगितले की ज्या यूजर्सनी त्यांच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार केलेला नाही त्या यूजर्सची फंक्शनॅलिटी मर्यादित केली जाणार नाहीत.

संसदेने परवानगी दिल्यानंतरच लागू होणार पॉलिसी

व्हॉट्सअॅपने न्यायालयात असे सांगितले आहे की जर भारताच्या संसदेने त्यांना परवानगी दिली तरच नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू केली जाईल. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. एकाच न्यायमूर्तींनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने याचिकेवरची ही सुनावणी होती.

एका न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला होता हा निर्णय

याआधीच्या एकाच न्यायमूर्तींच्या पीठाने कंपिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता ज्यात त्यांनी व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची तपासणी करण्यास सांगितले होते. व्हॉट्सअॅपच्या बाजूने प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी अपडेट डिस्प्ले दाखवत राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी