Whatsapp बदलणार, IPhone सारखे Features आता Android फोनमध्येही मिळणार

WHATSAPP FEATURES, WHATSAPP ANDROID UPDATE, NEW INTERFACE AND BOTTOM NAVIGATION BAR FOR WHATSAPP : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अपडेट होत आहे. व्हॉट्सअॅपचे अँड्रॉईड व्हर्जन अपडेट होणार आहे.

WHATSAPP
व्हॉट्सअॅप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Whatsapp बदलणार
  • IPhone सारखे Features आता Android फोनमध्येही मिळणार
  • Whatsapp चे अँड्रॉईड व्हर्जन अपडेट होणार

WHATSAPP FEATURES, WHATSAPP ANDROID UPDATE, NEW INTERFACE AND BOTTOM NAVIGATION BAR FOR WHATSAPP : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अपडेट होत आहे. व्हॉट्सअॅपचे अँड्रॉईड व्हर्जन अपडेट होणार आहे. अपडेट झाल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड व्हर्जनमध्ये आयओएस व्हर्जनमध्ये मिळणारी सर्व फीचर्स उपलब्ध होतील. यामुळे व्हॉट्सअॅपचे अँड्रॉईड व्हर्जन आणि आयओएस व्हर्जन सारखेच होणार आहे.

आयफोनसाठी आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम कार्यरत आहे. आयओएसवर चालणाऱ्या व्हॉट्सअॅपमध्ये ओपन केल्यावर चॅट, स्टेटस, सेटिंग हे सर्व टॅब खालच्या बाजूस दिसतात. आता अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हॉट्सअॅपमध्येही ओपन केल्यावर चॅट, स्टेटस, सेटिंग हे सर्व टॅब खालच्या बाजूस दिसतील. 

मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप नियमित अपडेट होत आहे. प्रायव्हसी कंट्रोल, स्टेटस/स्टोरी सेटिंग यात बदल झाले. व्हॉट्सअॅपमधील स्टेटससाठी एक वेगळे सेक्शन असल्याने त्यातही सतत बदल आणि अपडेट येत आहेत. युझरना स्टेटस बटणावर टॅप करून व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करता येणार आहे. इतर स्टेटसप्रमाणेच या व्हॉईस स्टेटसची मर्यादा 30 सेकंदांपर्यंत असणार आहे. स्टेटस टाकल्यानंतर 24 तासांनंतर आपोआप डिलीट होणार आहे.

रिकाम्या पोटी हे पदार्थ खा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

एका महिन्यात पंधरा किलो वजन घटवण्यासाठी करा हे डाएट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी