व्हॉट्सअॅपला 'ग्रहण', सेवा ठप्प

WhatsApp goes down, Meta says working to restore services : संवाद साधण्याचे माहिती शेअर करण्याचे लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे अॅप अशी व्हॉट्सअॅपची ख्याती आहे. हे लोकप्रिय अॅप तांत्रिक कारणामुळे मागील 1 तासापेक्षा जास्त कालावधीपासून बंद आहे.

WhatsApp goes down, Meta says working to restore services
व्हॉट्सअॅपला 'ग्रहण', सेवा ठप्प  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअॅपला 'ग्रहण', सेवा ठप्प
  • 1 तासापेक्षा जास्त कालावधीपासून बंद
  • व्हॉट्सअॅपवरून सर्व प्रकारची माहिती शेअर होणे बंद

WhatsApp goes down, Meta says working to restore services : संवाद साधण्याचे माहिती शेअर करण्याचे लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे अॅप अशी व्हॉट्सअॅपची ख्याती आहे. हे लोकप्रिय अॅप तांत्रिक कारणामुळे मागील 1 तासापेक्षा जास्त कालावधीपासून बंद आहे. व्हॉट्सअॅपवरून सर्व प्रकारची माहिती शेअर होणे बंद झाले आहे. मेसेज येत-जात नसल्यामुळे व्हॉट्सअॅपवरील संवाद (व्हॉट्सअॅप कम्युनिकेशन) ठप्प आहे.  व्हॉट्सअॅपची टेक टीम सेवा पूर्ववत करण्याचे तसेच रखडलेले मेसेज सेंड व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. बरेच प्रयत्न करून टेक टीमने थोड्या वेळापूर्वी मर्यादीत प्रमाणात व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू केले आहे. पूर्ण सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

देशभरातून मान्सूनने घेतला निरोप

राज्यातील अनेक शहरात फटाक्यांनी लावली आग

जेव्हा व्हॉट्सअॅप बंद पडले तेव्हा अनेकांना आपल्या इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला असे वाटले. पण इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू आहेत हे बघितल्यावर युझरना व्हॉट्सअॅप बंद पडल्याचे लक्षात आले. आधी किरकोळ समस्या असेल आणि काही मिनिटांत व्हॉट्सअॅप सुरू होईल असे अनेक युझरना वाटत होते. पण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला तरी व्हॉट्सअॅप सुरू झाले नाही आणि समस्या व्हॉट्सअॅपच्या यंत्रणेची आहे यावर शिक्कामोर्तब झले.

व्हॉट्सअॅप बंद झाल्यापासून ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर  #whatsappdown हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. मीम्स तसेच मतप्रदर्शन करून अनेक सोशल मीडिया युझर स्वतःचे मत मांडत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी