WhatsApp चे code verify अपडेट

WhatsApp introduces Code Verify : व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इस्टंट मेसेजिंग अॅपने 'व्हॉट्सअॅप वेब'च्या सुरक्षेसाठी 'कोड व्हेरिफाय' हे नवे सिक्युरिटी अपडेट लाँच केले.

WhatsApp introduces Code Verify
WhatsApp चे code verify अपडेट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • WhatsApp चे code verify अपडेट
  • नवे सिक्युरिटी अपडेट लाँच
  • 'व्हॉट्सअॅप वेब'च्या सुरक्षेसाठी अपडेट

WhatsApp introduces Code Verify : व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इस्टंट मेसेजिंग अॅपने 'व्हॉट्सअॅप वेब'च्या सुरक्षेसाठी 'कोड व्हेरिफाय' हे नवे सिक्युरिटी अपडेट लाँच केले. हे एक ब्राउझर एक्सटेंशन आहे. हे एक्सटेंशन व्हॉट्सअॅपचा युझरला दिसत असलेला कोड व्हेरिफाइड असल्याची माहिती देते. यामुळे आपण व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेब व्हर्जनचा वापर करत असल्याची युझरची खात्री होण्यास मदत होईल. 

इंटरनेट विश्वात व्हॉट्सअॅपच्या नावाशी मिळत्याजुळत्या नावाच्या वेबसाइट अस्तित्वात आल्या आहेत. स्पेलिंगमध्ये किरकोळ बदल करून या वेबसाइट चालविल्या जात आहेत. अनेक युझरना या बनावट वेबसाइटमुळे खरे 'व्हॉट्सअॅप वेब' कोणते असा प्रश्न सतावू लागला आहे. यावर उपाय म्हणून 'कोड व्हेरिफाय' हे नवे सिक्युरिटी अपडेट लाँच करण्यात आले आहे. 

'कोड व्हेरिफाय' हे एक्सटेंशन वापरले तरी आणि वापरले नाही तरी अधिकृत 'व्हॉट्सअॅप वेब'च्या युझरना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही. 'कोड व्हेरिफाय' हे एक्सटेंशन व्हॉट्सअॅपचा युझरला दिसत असलेला कोड व्हेरिफाइड आहे एवढीच माहिती देणार आहे. 

व्हॉट्सअॅप आणि क्लाउडफेअर (Cloudfare) यांनी संयुक्तपणे 'कोड व्हेरिफाय' हे एक्सटेंशन विकसित केले आहे. व्हॉट्सअॅपचे सर्व संदेश 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन'मुळे सुरक्षित आहेत. संदेश पाठविणारा आणि तो स्वीकारणार या दोघांनाच ते वाचता येतात. व्हॉट्सअॅपचा सर्व डेटा सुरक्षित आहे. पण युझरची व्हॉट्सअॅप वापरण्याबाबतची विश्वासार्हता आणखी वाढावी यासाठी 'कोड व्हेरिफाय' हे ब्राउझर एक्सटेंशन काम करणार आहे. 

'कोड व्हेरिफाय' हे ब्राउझर एक्सटेंशन गूगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज, फायरफॉक्स यांच्यासह सर्व लोकप्रिय ब्राउझरवर वापरता येईल. मायक्रोसॉफ्ट एज आणि फायरफॉक्सवर 'कोड व्हेरिफाय' हे ब्राउझर एक्सटेंशन स्वतःच पिन होते तर क्रोममध्ये ते पिन करावे लागते. 

'व्हॉट्सअॅप वेब'चे पेज ओपन केल्यावर एक क्यू आर कोड दिसतो. हा कोड दिसताच युझरने 'कोड व्हेरिफाय' या ब्राउझर एक्सटेंशनवर क्लिक करायचे आहे. कोड योग्य असल्यास एक्सटेंशन ग्रीन सिग्नल दाखवेल आणि तुम्ही निर्धोकपणे 'व्हॉट्सअॅप वेब'चा वापर करू शकाल. पण रेड किंवा नारंगी सिग्नल आला तर कोडमध्ये कमी जास्त प्रमाणात गडबड आहे असे समजून पेज रिफ्रेश करणे किंवा 'व्हॉट्सअॅप वेब'चे अधिकृत पेज शोधून तिथून 'व्हॉट्सअॅप वेब' वापरणे हाच सुरक्षित पर्याय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी