WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या काय आहे खास 

WhatsApp update: व्हॉट्सअॅपने आपलं नवं बीटा व्हर्जन रिलीज केलं आहे. या नव्या व्हर्जनमध्ये अनेक बदल आणि नवे फिचर्स जोडले गेले आहेत. जाणून घ्या नव्या व्हॉट्सअॅप अपडेट्समध्ये काय आहे खास...

whatsapp latest update android new emoji users happy technology news marathi
WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या काय आहे खास  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • व्हॉट्सअॅप लेटेस्ट बीटा व्हर्जन 2.19.315 मध्ये नव्या सुविधा
  • नव्या अपडेटमध्ये अनेक नवे इमोजी, मात्र नवं फिचर नाही
  • यासोबतच नव्या अपडेटमध्ये जुने इमोजी सुद्धा बदलासह उपलब्ध केले आहेत

नवी दिल्ली: WhatsApp युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअॅपने आपलं सॉफ्टवेअर अपडेट व्हर्जन रिलीज केलं आहे. हे अपडेट गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी आणलेल्या या व्हॉट्सअॅपच्या नव्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये अनेक नवे ईमोजी आणि सध्या असलेल्या ईमोजीमध्येही बदल करण्यात आले आहेत. या फिचर्समध्ये डार्क मोडचा समावेश करण्यात आलेला नाहीये.

व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर्स WhatsApp बीटाच्या लेटेस्ट अपडेट 2.19.315 मध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपच्या फिचर्सवर नजर ठेवणारी वेबसाईट WABetaInfo ने सर्वप्रथम हे फिचर्स स्पॉट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या या नव्या अपडेटमध्ये कंपनीने आणखीन इतर कुठलेही नवे फिचर जोडलेले नाहीयेत.

जर तुम्ही गुगलच्या प्ले बीटा टेस्टिंग प्रोग्रामचा हिस्सा नाहीयेत तर तुम्ही एपीके मिरर व्हर्जन डाऊनलोड करु शकतात. या नव्या अपडेटमध्ये युजर्सला ईमोजीमध्ये कलर व्हेरिएंट, कलर ब्लॉक आणि नवे पोस्टर दिसून येत आहेत. या अपडेटमध्ये लेटेस्ट यूनिकोड स्टँडर्ड सपोर्ट आहे. सध्या WhatsAppच्या बीटा व्हर्जनमध्ये डार्क मोट किंवा नाइट मोड यांचं अपडेट आलेलं नाहीये. नुकतंच व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड युजर्ससाठी फिंगरप्रिंट लॉक स्क्रीन फिचर उलब्ध केलं आहे. व्हॉट्सअॅप आयओएस व्हर्जनवर हे फिचर यापूर्वीपासूनच उपलब्ध होतं. 

आता व्हॉट्सअॅप युजर्स डार्क मोड, नेटफ्लिक्स ट्रेलर व्हिडिओ प्लेबॅक यांसारखे फिचर्स कधी जोडले जाणार याची वाट पाहत आहेत. मात्र, हे फिचर्स नेमके कधी लॉन्च होणार यासंदर्भातील माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाहीये. डार्क मोड फिचर विविध ट्विटर, युट्यूब सोबतच इतरही सोशळ मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलबध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी